महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात हार, प्रसाद स्वीकारणे बंद - दगडूशेठ हलवाई गणपती पुणे न्यूज

राज्य सरकारने कोरोनाबाबत जी नियमावली जाहीर केली आहे, त्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. वयोवृद्ध, आजारी, गरोदर महिला, १० वर्षाखालील लहान मुलांना मंदिरात प्रवेश देण्यात येत नाही.

दगडूशेठ हलवाई गणपती
दगडूशेठ हलवाई गणपती

By

Published : Feb 24, 2021, 3:37 PM IST

Updated : Feb 24, 2021, 4:38 PM IST

पुणे- राज्याबरोबरच पुणे शहरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रसाद, फुले, हार स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच भाविकांना मंदिरात येताना थर्मामीटर चेकिंग, सॅनिटायझर करूनच प्रवेश दिला जात आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात हार, प्रसाद स्वीकारणे बंद
भाविकांची गर्दीही कमीशहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. परिणामी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील कमी झाली आहे. दर्शनासाठी दिलेल्या नियमावलीचे संपूर्णपणे पालन करून भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. मंदिरात येताना भाविकांना सोशल डिस्टंसिंग तसेच थर्मल स्कॅनिंग आणि मास्क अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कार्याध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालनराज्य सरकारने कोरोनाबाबत जी नियमावली जाहीर केली आहे, त्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. वयोवृद्ध, आजारी, गरोदर महिला, १० वर्षाखालील लहान मुलांना मंदिरात प्रवेश देण्यात येत नाही. तसेच भाविकांना विना मास्कही प्रवेश दिला जात नाही. भक्तांना मंदिरात प्रवेश देताना प्रत्येकाची थर्मल तपासणी करण्यात येत आहे. तसेच मंदिरातील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणीही करण्यात येत आहे.
Last Updated : Feb 24, 2021, 4:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details