महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक; नियम शिथिल करण्याची मागणी - anand nagar corona hotspot

आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत गोंधळ घातला. जमलेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली, त्यामध्ये काही पोलीस अधिकारी जखमी झाले.

pimpri-chinchawad
पिंपरी-चिंचवडमध्ये संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक

By

Published : Jun 8, 2020, 7:34 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) - शहरातील आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नियम शिथिल करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत गोंधळ घातला. पोलीस अधिकारी या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलीस जखमी झाले.

सुमारे आठ ते दहा हजार नागरिकांची वस्ती असलेल्या आनंद नगर झोपडपट्टीमध्ये आतापर्यंत १५०पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा परिसर हॉटस्पॉट घोषित करून प्रतिबंधित करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. मात्र, महानगरपालिका प्रशासन केवळ आपल्याला डांबून ठेवत असून कोणत्याही सुविधा पुरवत नसल्याचा आरोप करीत आज दुपारी हे नागरिक रस्त्यावर उतरले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

अनलॉक ५.० सुरू झाल्याने आम्हालाही बाहेर पडू द्या, सगळ्या तपासण्या करून कामावर जाऊ द्या आणि मूलभूत सुविधा पुरवा, अशी त्यांची मागणी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आल्याने पोलिसांनी त्यांना घरात परत जाण्याची विनंती केली. मात्र ते जुमानत नसल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यात एक स्थानिक तरुण किरकोळ जखमी झाला. त्यामुळे आंदोलनकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. याआधीही हे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती

पिंपरी-चिंचवडमध्ये संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक

महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच हा प्रकार घडल्याचे परिसरात बोलले जात आहे. हॉटस्पॉट बनलेल्या या झोपडपट्टीतील कोरोनाबाधित नागरिकांच्या कुटुंबीयांबरोबरच इतर नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी महापालिकेने नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, ते न झाल्यामुळेच नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सध्या आनंद नगर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून येथे तणावपूर्ण शांतता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details