बारामती- इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे दीड वर्षापूर्वी एका दुचाकी चालकाला आडवून त्याच्याकडील पन्नास किलो मानवी डोक्याच्या केसांची चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी महेश निंबाळकर (रा.शेळगाव ता.इंदापूर ) यांनी फिर्याद दिली होती. वालचंदनगर पोलिसांनी तपास करून चोरीस गेलेल्या मालापैकी १ लाख ९० हजार रुपये रोख व १२ किलो केस निंबाळकर यांना परत केले आहेत.
दमदाटी करून ५० किलो केस लंपास...
इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील महेश सुभाष निंबाळकर हे गावोगावी फिरून केसावरती भांडी विक्रीचा व्यवसाय करतात. मागील वर्षी १८ जुलै रोजी निंबाळकर हे इंदापूर- बारामती रस्त्याने ५० किलो केस घेऊन बारामतीकडे विक्रीसाठी निघाले होते. मात्र, सकाळी नऊच्या सुमारास लासुर्णे येथील चिखली फाटा येथे निंबाळकर यांना अनोळखी चोरांनी अडवड दमदाटी करुन ५० किलो केस लंपास केले होते.