महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्याच्या तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी - अज्ञात

तुळशीबाग परिसरातील राम मंदिरामध्ये एका अज्ञात चोरट्याने राम आणि लक्ष्मण या दोघांच्या मूर्तीच्या पायातील चांदीचे चाळ चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुण्याच्या तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी

By

Published : May 4, 2019, 6:13 PM IST

पुणे- तुळशीबाग परिसरातील राम मंदिरामध्ये एका अज्ञात चोरट्याने राम आणि लक्ष्मण या दोघांच्या मूर्तीच्या पायातील चांदीचे चाळ चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. शहराच्या मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे मंदिरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

पुण्याच्या तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरातील गजबजलेल्या तुळशीबाग परिसरातील राम मंदिरात १ मे रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांना मूर्तींना चाळ नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात विश्वस्त मंडळाला माहिती दिली. विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली.

यामध्ये मंदिरातील पुजारी नळावर पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका अनोळखी तरुणाने मंदिराच्या गाभाऱयात प्रवेश करून मूर्तीचे चाळ चोरून नेले, असे लक्षात आले आहे. यासंदर्भात विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details