महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime: धक्कादायक! सावत्र मुलाचा आईच्या बँकेतील ११ काेटी ४० लाखांच्या रकमेवर डल्ला - सावत्र मुलाने बॅंक खात्यातील रक्कम चोरली

पुण्यात तर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. औंधमध्ये एका सावत्र मुलाने आईच्या बँक खात्यावर वडिलांनी ठेवलेल्या ११ काेटी ४० लाख 28 हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, या आरोपी मुलाने बनावट ईमेल आयडी बनवून स्वतःचे मोबाईल नंबर रजिस्टर केला. यानंतर म्युच्युअल फंड खात्यातील ११ काेटी ४० लाख २८ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.

Pune Crime
आईच्या बॅंक खात्यातील रक्कम चोरली

By

Published : Feb 9, 2023, 6:50 PM IST

पुणे :याप्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे पाेलिसांना आदेश दिल्यावर घटनेनंतर तब्बल दाेन वर्षांनी मुकुंद अशाेक कैरे (वय ५१, रा. नाेएडा, उत्तर प्रदेश) याच्यावर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत चतुश्रृंगी पाेलीस ठाण्यात आरती अशाेक कैरे (वय-७०) यांनी पाेलिसांकडे सावत्र मुलाविराेधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2020 यादरम्यान घडलेली आहे.

म्हातारपणाचा आधार काढून घेतला :पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकुंद कैरे हा तक्रारदार यांचा सावत्र मुलगा आहे. त्यांचे पती अशाेक कैरे हे हयातीत असताना त्यांनी पत्नीच्या भविष्याकरिता केलेली म्युच्युअल फंड खात्यात एकूण रक्कम ११ काेटी ४० लाख २८ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. ही रक्कम 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2020 यादरम्यान त्यांच्या मृत्यूच्या वेळी ताब्यात असताना या रकमेचा अपहार करुन आरोपीने ती काढून घेतली.

अशाप्रकरारे केली पैशाची चोरी : सावत्र मुलाने ऑगस्ट 2020 मध्ये अशाेक कैरे यांचे नावाचा बनावट ईमेल आयडी तयार केला. आराेपीने संबंधित वेगवेगळया म्युच्युअल फंड खात्याचा अशाेक कैरे यांचा नाेंदणीकृत माेबाईल क्रमांक बदलून त्यात स्वत:चा माेबाईल क्रमांक रजिस्टर केला. ताे माेबाईल क्रमांक अशाेक कैरे यांचाच असल्याचे भासवून रजिस्टर्ड केला. त्यानंतर त्याने बनावट ईमेल आयडी आणि बदललेल्या रजिस्टर्ड माेबाईल क्रमांकाचा गैरवापर करून म्युच्युअल फंड खात्यातील सर्व रकमा स्वत:च्या बँक खात्यात जमा केल्या. अशाप्रकारे या रकमेचा अपहार करून त्यांची फसवणूक करण्यात आली.

लग्नाचे आमीष दाखवून लाखोंची फसवणूक :पुण्यात यापूर्वीही आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. असाच एक प्रकार 25 जानेवारी, 2022 रोजी घडला होता. यामध्ये तरुणींना लग्नाचे आमीष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनी आतापर्यंत तब्बल 255 तरुणींना दीड कोटींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. तर अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचे काही तरुणींनी तक्रारीत म्हटले होते.

आर्थिक लूट अन् लैंगिक शोषण :आरोपी गलेलठ्ठ पगार असलेल्या तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा. निशांत रमेशचंद्र नंदवाना (वय 33 वर्षे) आणि विशाल हर्षद शर्मा ( वय 33 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी आतापर्यंत तब्बल 255 तरुणींना दीड कोटींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. तर अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचे काही तक्रारीत म्हटले आहे. आरोपी हे वेगवेगळ्या नावांनी तरुणींना फसवत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :Ram Mandir Chaukhat: अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात बसवली चौकट.. पहा फोटो अन् घ्या दर्शन

ABOUT THE AUTHOR

...view details