पुणे- सरकारने जाहीर केलेल्या 'ईडब्लूएस' आरक्षणाचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी स्वागत केले आहे. विद्यार्थी आणि तरुणांनी नोकरी आणि शिक्षणात याचा लाभ घ्यावा, अशी इच्छाही यावेळी प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केली.
मराठा समाजासाठी 'ईडब्ल्यूएस' आरक्षणाचे स्वागत - प्रवीण गायकवाड - ईडब्लूएस आरक्षण मराठा आरक्षण
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठा संघटना आक्रमक झाल्या असताना सरकारने जाहीर केलेल्या ईडब्लूएस आरक्षणाचे स्वागत प्रवीण गायकवाड यांनी केल्याने मराठा समाजात मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठा संघटना आक्रमक झाल्या असताना सरकारने जाहीर केलेल्या ईडब्लूएस आरक्षणाचे स्वागत प्रवीण गायकवाड यांनी केल्याने मराठा समाजात मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर 25 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्याआधीच राज्य सरकारने मराठा समाजाला ईडब्लूएस आरक्षण जाहीर केल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आहे.
मी ईडब्लूएसच्या बाजूने
'ईसीबीसी'ला घटनेचा आधार नसल्याने मी ईडब्लूएसच्या बाजूने आहे. राज्य सरकारने आरक्षणासाठी एखादा कायदा केला तर त्याचा फारसा फायदा नसतो, त्याला घटनेचा आधार नसतो. केंद्र सरकारने घटनेत दुरुस्ती केल्याने मी ईडब्लूएस आरक्षणाच्या बाजूने आहे, असे मत यावेळी प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले. मराठा समजाला विशेष प्रवर्ग म्हणून आरक्षण देणे हे नव्या घटना दुरुस्तीनुसार शक्य नसून मराठा समाजातील मोठा वर्ग हा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहे. फडणवीस सरकारने केलेला एसईबीसीचा मराठा आरक्षणाचा कायदा चुकीचा होता. हे आरक्षण घटनेच्या चौकटीत बसणारे नाही, म्हणून हा दिलेले आरक्षण टिकूच शकत नाही, असेही यावेळी गायकवाड म्हणाले.