महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन लाखांची शेतकरी कर्जमाफी ही बुजगावणी - बच्चू कडू - राज्यमंत्री बच्चू कडू

तुरीच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हे नुकसान अगणित असून त्याचा अंकात विचारही करू शकत नाही. हे सांगतानाच त्यांनी शेतकऱ्यांना दोन लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणी असल्याचे म्हटले.

बच्चू कडू
बच्चू कडू

By

Published : Feb 5, 2020, 10:44 PM IST

Updated : Feb 5, 2020, 10:58 PM IST

पुणे -आत्तापर्यंत आम्हाला किती लुटले गेले याचा हिशोब सरकारने दिला तर त्यांच्याकडेच शेतकऱ्यांचे पैसे निघतील, असे म्हणत महाविकास आघाडीच्या कर्जमाफीवर प्रश्न उपस्थित करत दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी असल्याचे वक्तव्य महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यमंत्री बच्चू कडू
तूर डाळीला हमीभाव देणे आणि तो जाहीर करणे, हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण, केंद्र सरकार त्यांचे काम जबाबदारीने करत नाही, अशी खंत बच्चू कडूंनी बोलताना व्यक्त केली. तुरीच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हे नुकसान अगणित असून त्याचा अंकात विचारही करू शकत नाही. हे सांगतानाच त्यांनी शेतकऱ्यांना दोन लाखाची दिलेली कर्जमाफी ही बुजगावणी असल्याचे म्हटले.

हेही वाचा -'महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत'


कायद्यावर कायदे येत आहेत, पण शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा मात्र हे केंद्र सरकार आणू शकत नाही, अशी शोकांतिका शेतकऱ्यांसाठी लढा देणारे राज्यमंत्री बच्चू कडूंनी व्यक्त केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उद्देशून बोलताना हिंदुत्व सोडले नसेल तर ते एनआरसीला समर्थन देतील, असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना बच्चू कडूंनी राज्यातील प्रश्नांचे प्राधान्यक्रम ठरवण्याचा भाजपला सल्ला दिला.

अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहाच्या निकृष्ट अन्नाचा विषय दोन दिवसात निकाली काढून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याने बच्चू कडूंनी ठेकेदारावर कारवाई करण्याचे ही आश्वासन दिले.

हेही वाचा -'शिवसेना शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करणार'


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना हिंदूंच्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देऊ नये, असे पत्रक काढणाऱ्या संघटनेला गांभीर्याने घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मनस्तापामुळे सुट्टीवर गेले, असे वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे हे विचार करण्याऐवढे मोठे नाहीत. त्यामुळे राणेंना काही अर्थ नाही, त्यांनी आत्तापर्यंत किती पक्ष बदलले. हे पाहता त्यांच्या शब्दांचा आपण किती विचार करावा, अशी राणेंची खिल्ली बच्चू कडूंनी उडवली.

Last Updated : Feb 5, 2020, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details