पुणे -माय अर्थ फाउंडेशन तर्फे जागतिक युवा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट, नदी पुनरुज्जीवन, अशा विविध विषयांवरील शॉर्टफिल्मचा या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे. 11 आणि 12 जानेवारी असे दोन दिवस या फेस्टिव्हलचे आयोजन पुण्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालनात करण्यात आल्याची माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी दिली.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन - My Earth Expedition Pune
माय अर्थ फाउंडेशन तर्फे जागतिक युवा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट, नदी पुनरुज्जीवन, अशा विविध विषयांवरील शॉर्टफिल्मचा या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे.
सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद
हवामानातील बदलामुळे निसर्गावर परिणाम झाला आहे. अनियमित पाऊस, तापमाणात झालेली वाढ या सारख्या संकटाला आपण सध्या समोर जात आहेत. त्यामुळे निर्सगाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. तसेच या फेस्टिव्हलमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घेण्याचे आवाहनही आयोजकांनी केले आहे.