महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar on Doctor Strike: जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप: राज्य शासनाने तात्काळ लक्ष द्यावे- अजित पवार - J J hospital Doctors strike

मुंबई येथील जे. जे. रुग्णालयातील जवळपास 700 निवासी डॉक्टर संपावर गेल्याने तेथील रुग्णसेवा कोलमडली आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्यात केली आहे.

Ajit Pawar on Doctor Strike:
अजित पवार

By

Published : Jun 2, 2023, 5:04 PM IST

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे: मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाच्या नेत्र विभागातील प्रमुख डॉक्टर राघिनी पारेख आणि वरिष्ठ डॉक्टर यांच्या सह 9 डॉक्टरांनी अचानक राजीनामा दिला. यानंतर रुग्णालयातील जवळपास 700 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. याचा मोठा परिणाम रुग्ण सेवेवर झाला आहे आणि तिथे रुग्णांचे हाल होत आहेत. हे राज्य शासनाने तात्काळ थांबवले पाहिजे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

'या' कार्यक्रमाला पवारांची उपस्थिती: श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तोलनार पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पाहुणे म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी ते मंचावरून बोलत होते.

मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातील 750 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेलेले आहेत. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे. हे सरकारने तात्काळ थांबविलेपाहिजे. अशा प्रश्नांवर मार्ग काढण्यात राज्य सरकार कमी पडत आहे. यावर तातडीने मार्ग काढण्याची गरज आहे. - अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेता


'त्या' प्रस्तावाचे स्वागतच, पण:अजित पवार यांना अहमदनगरच्या नामांतराबाबत विचारले असता ते म्हणाले की, महापुरुषांचे नाव द्यायचे प्रस्ताव येतात तेव्हा आम्ही सर्व राजकीय व्यक्ती त्याचे स्वागतच करत असतो; पण स्वातंत्रवीर सावरकर यांचा एक कार्यक्रम सरकारने घेतला. यामध्ये अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे काढले गेले. हे दाखवायला सुरुवात झाली तेव्हा पुतळे हलवायचे काय कारण होते? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला.

'त्यावर' राजकारण करू नये:शिंदे-भाजप शासन काळात महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये केली जात आहेत. राज्य शासनाने नामांतरासाठी हीच वेळ का निवडली? हे देखील पाहावे लागेल. नामांतराच्या विषयात कोणीही राजकारण आणू नये, असे यावेळी अजित पवार म्हणाले.

हेही वाचा:

  1. Congress Meetings : लोकसभा पूर्वतयारीसाठी काँग्रेसच्या बैठका; पवार-अदानी भेटीवरून नानांचा राष्ट्रवादीला चिमटा
  2. Vote From Home : लोकसभा निवडणूक 2024, ज्येष्ठांसह दिव्यांग नागरिकांना पहिल्यांदाच घरून करता येणार मतदान
  3. Sanjay Raut Vs Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे सिंहासन लवकर हलणार-संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details