पुणे - राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज पुण्यात अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या विद्यार्थ्यांमध्ये एक आयसीआयआर मधून प्रवेश घेतलेले आणि दुसरे सेल्फ फंडिंगमधून प्रवेश घेतलेले, असे दोन प्रकार आहेत. पुणे विद्यापीठात 541 अफगाणिस्तानी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. काही तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबले आहेत. महाराष्ट्र शासन राज्यात असलेल्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहे. त्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी शासन त्यांच्या बरोबर आहे, अशी आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच आठवड्याभरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शरद संस्थेच्यावतीने आयोजित महाराष्ट्रातील अफगाण विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च शिक्षण संचालक धनराज माने सर्वच संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, किरण साळी आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हिसाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल -