महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राला कृषी आयुक्तांनी दिली भेट

असंघटीत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांंना चालना देण्यासाठी देशात 'प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन'(पीएमएफएमइ) योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली.

By

Published : Dec 13, 2020, 8:51 AM IST

Dheeraj Kumar
धीरज कुमार

पुणे (बारामती) - केंद्र सरकारमार्फत नुकतीच राज्यातील असंघटीत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांंना चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत 'प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन'(पीएमएफएमइ) योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील २० हजार उद्योगांंचे सक्षमीकरण केले जाणार आहे. सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांंचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक संस्था म्हणून बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राची निवड झाली आहे. त्या अनुषंगाने या कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या विविध सेवा सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्य कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी भेट दिली.

कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या विविध सेवा सुविधांचा आढावा घेताना धीरज कुमार

नाविन्यपूर्ण प्रकल्पाबद्दल कौतुक -

देशी गोवंश सुधार प्रकल्पामध्ये दुध व त्यावरील प्रक्रिया, मांस व कुक्कुट पालन उद्योग प्रक्रिया, भाजीपाला गुणवत्ता केंद्रामधील फळ व भाजीपाला प्रक्रियांची माहिती कुमार यांनी घेतली. शेतकरी उत्पादक कंपन्या मार्फत नियार्तक्षम शेतीबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली, मत्स्य व समुद्रातील उत्पादन प्रक्रिया, तेल बिया व स्नीग्ध पदार्थ प्रक्रिया व शेतकरी गटाने केलेले उत्पादने, मसाले व त्याची पिके, विविध बचत गटाने केलेले पदार्थ, औषधी वनस्पती प्रक्रिया, धान्य प्रक्रिया विभाग, बेकरी युनिट इत्यादी विभागांनाही त्यांनी भेट देत माहिती घेतली. तसेच नाविन्यपूर्ण प्रकल्पाबद्दल कुमार यांनी कौतुक केले.

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राला राज्य कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी त्यांचे स्वागत केले. भेटीदरम्यान कुमार यांच्या समवेत कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक नांगरे उपस्थित होते. पुणे विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, तंत्र अधिकारी वारळे, शिळकर, बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी बालाजी ताटे हेही उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांनी संस्थेच्या विविध विभागांची ओळख करून दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details