बारामती - लोकांना कमी कमीत त्रासात व कमी वेळेत एका भागातून दुसऱ्या भागात जाता यावे. दळणवळणाचे उत्तम साधन निर्माण व्हावे. याकरीता मुंबई, पुणे, हैदराबाद अशी बुलेट ट्रेन सुरु करण्याचा मानस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. तालुक्यातील कटफळ येथे गावठाण भूमापन ड्रोन सर्वेक्षण कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
...असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला -
गावामध्ये कोणी जर दहशत माजवण्याचा व त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर कोणताही विचार न करता त्याच्यावर थेट ॲक्शन घ्या. भलेही उद्या त्याच्यावर तडीपार करण्याची व मोक्का लावण्याची वेळ आली, तरी विचार करू नका. अशा सूचना पोलीस प्रशासनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. कार्यक्रम चालू असतानाच उपस्थित ग्रामस्थाने गावातील दारू बंद करण्याची विनंती उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली. तेव्हा पवारांनी सदर कार्यक्रमाला येण्याअगोदरच घडलेला प्रसंग सांगितला. पवार म्हणाले की, एक जण तर दुपारीच चंद्रावर गेला होता. मी त्याला म्हंटले. अरे दुपार हाय. दुपार आहे. श्रावणी शनिवार हाय राव. असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुढे पवार म्हणाले की, काय आता करता... व्यसनाधीन झाल्यानंतरही खूप त्रास होतो. त्यांना व्यसनापासून दूर करण्याचे काम आपण केले पाहिजे.