महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'...म्हणून लवासात कोविड केअर सेंटर सुरू करा ' - MP girish bapat news

मुळशी तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लवासामध्ये कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी खासदार गिरीश बापट यांनी केली आहे.

girish bapat
girish bapat

By

Published : Jul 30, 2020, 2:08 PM IST

पुणे - मुळशी तालुक्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लवासामध्ये कोविड सेंटर सुरू करा, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत पत्रव्यवहार केल्याचे सांगितले.

बापट म्हणाले, मुळशी विभागातून अनेक कोरोनाबाधित पुणे शहरात येत आहे. त्यामुळे पुणे शहरावर ताण पडत आहे. त्यामुळे आम्ही माहिती घेतली असता असे आढळले की लवासामध्ये तयार असलेले एक रुग्णालय आहे. त्याठिकाणी रुग्णांसाठी खाट, स्वयंपाकगृहाची सोय आहे. पण, रुग्णसेवेसाठी लागणारे साहित्य नाही. त्यामुळे ती जागा मुळशी तालुक्यातील रुग्णांसाठी उपलब्ध करुन द्यावी. यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details