महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी; अजित पवारांचे आवाहन - अजित पवार एसटी आंदोलकांना आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू (ST Workers Strike) आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या शाळा महाविद्यालय सुरू झाले आहेत. गरिबांना परवडणारा प्रवास म्हणून एसटीकडे पाहिले जाते. याचा विचार करून एसटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers) केले.

ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Feb 19, 2022, 9:31 PM IST

Updated : Feb 19, 2022, 10:33 PM IST

बारामती(पुणे) -एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू (ST Workers Strike) आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजूबाजूच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आपल्याही कर्मचाऱ्यांना आणले आहे. पूर्वी त्यांचे वेतन जरूर कमी होते. सध्या याबाबतचा निर्णय न्यायालयात आहे. सध्या शाळा महाविद्यालय सुरू झाले आहेत. गरिबांना परवडणारा प्रवास म्हणून एसटीकडे पाहिले जाते. याचा विचार करून एसटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers) केले.

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती पंचायत समितीच्या (Baramati Panchayat Samiti) नूतन इमारतीचे उद्घाटन शनिवार (19 फेब्रुवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

  • जिरायती भागात पाणी प्रश्न सुटलेला असेल -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सुरू असणाऱ्या विकासकामांचा आढावा घेत अनेक प्रकल्पांची माहिती घेतली. ते म्हणाले, आगामी काळात देखील बारामतीसाठी अनेक प्रकल्प योजना नियोजित आहेत. त्या सर्व कामांचे नियोजनठिकाणी सांगणार नाही. नाहीतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री भरणे म्हणतील की अजित पवार हे फक्त बारामतीचे अर्थमंत्री आहेत काय? पवार पुढे म्हणाले, आजपर्यंत बारामतीतील विरोधकांनी जिरायत पट्ट्यातील पाणी प्रश्नावरुन राजकारण केले. आगामी काळात जिरायत पट्ट्यातील पाणी योजना पूर्ण करून पन्नास वर्षापासून असलेला हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहे. त्यामुळे येथून पुढे कोणी तुम्हाला पाणी मिळालं का असं सांगायला येणार नाही.

  • बारामती शहर आणि तालुक्याचा वेगाने विकास -

बारामती शहरात अनेक कार्यालये आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुंदर इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. कवी मोरोपंतांच्या स्मारकचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समितीची सर्व सुविधायुक्त वास्तू, अद्ययावत क्रीडा संकुल, पाणी पुरवठा योजना आदी सुविधा जनतेसाठी निर्माण करण्यात येत आहेत. बारामती बसस्थानकाचे काम पूर्ण होत आहे. हे बसस्थानाक राज्यातील प्रमुख स्थानकात गणले जाईल. बारामती हे शिक्षणाचे ‘हब’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Last Updated : Feb 19, 2022, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details