पुणे -खेड - आळंदी मतदान केंद्रावर मतदान साहित्य आणि कर्मचाऱ्यांना घेवून जाणाऱ्या एसटी बस चिखलात अडकून पडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे राजगुरुनगर येथील क्रीडा संकुल मैदानावर सर्वत्र चिखल झाला असून यात अडकलेल्या एसटी बसेसला ट्रॅक्टर आणि क्रेनच्या काढण्याचे काम सुरू आहे.
राजगुरुनगरमध्ये मतदान साहित्य आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसेस चिखलात अडकल्या हेही वाचा -कारागृहाऐवजी रमेश कदम ठाण्यातील घरात, 1 पोलीस बडतर्फ तर 4 निलंबित
राजगुरुनगर येथुन मतदान केंद्रावर साहित्याची वाहतुक करण्यासाठी एस टी बस रात्रीपासुन हुतात्मा राजगुरु क्रिडा संकुल येथे उभ्या होत्या. शनिवार पासून उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कालपासून उभ्या असलेल्या एसटी बस या क्रीडा संकुलच्या मैदानावर चिखलात अडकून बसल्याने मतदान केंद्रावर जाणा-या गाड्या वेळेवर पोहचणार का असा प्रश्नच आहे.
हेही वाचा -राज्यातील पहिला मतदार गुजरातचा रहिवासी, आयोगाचा भोंगळ कारभार
दरम्यान, रविवारी सर्व कर्मचारी बुथ केंद्रावर मुक्कामी जाणार आहेत. मात्र, सकाळपासुनच सुरु असलेल्या पाऊसाने राजगुरुनगर येथील क्रिडा संकुल येथे चिखलात गाड्या अडकल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे.