पुणे - खेड तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या साकुर्डी गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राची लाल परी एसटी बससेवा सुरू झाली आहे. राजगुरूनगर बसस्थानकातून जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करून या बसची सुरुवात करण्यात आली.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पुण्यातील साकुर्डी गावाला लाल परीची फेरी सुरू - pune
ग्रामिण भागात दळणवळणासाठी एसटी बस हे एकमेव साधन आहे. आजपर्यत साकुर्डी आणि चासकमान धरणाच्या डोंगराळ भागातील गावांना दळणवळणासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता.
ग्रामिण भागात दळणवळणासाठी एसटी बस हे एकमेव साधन आहे. आजपर्यत साकुर्डी आणि चासकमान धरणाच्या डोंगराळ भागातील गावांना दळणवळणासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. त्यातुन शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांनाही अडथळे येत होते. मात्र, आता एसटी बस राजगुरुनगर ते साकुर्डी वडगाव पाटोळे-दोंदे-सायगाव-वेताळे मार्गे साकुर्डीला जाणार आहे. त्यामुळे पश्चिम भागातील नागरिक, तसेच शाळकरी मुलांना याचा फायदा होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी सांगितले
गावात पहिल्यांदा एसटी बस आल्याने गावकऱ्यांसह नागरिकांनी शाळकरी मुलांनी एसटी बसची पुजा करत स्वागत केले. ही बस सेवा कायमस्वरुपी सुरू रहावी, अशी मागणीदेखील गावकऱ्यांनी केली आहे.