दौंड(पुणे) - दौंड रेल्वे स्थानकावरून 1172 मजुरांना घेवून श्रमिक विशेष रेल्वे ग्वाल्हेरकडे रवाना झाली. या विशेष रेल्वे गाडीस दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील यांनी हिरवा ध्वज दाखवला. यावेळी दौंड रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक सम्युल क्लिफटन, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, तालुका आरोग्य अधिकारी अशोक रासगे आदी उपस्थित होते.
दौंड तालुक्यातील परप्रांतीय मजूर जाण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वेची सोय दौंड रेल्वे स्थानकात करण्यात आली होती. या रेल्वेगाडीला चोवीस डबे लावण्यात आलेले होते. यातील एका डब्यात 72 जागा बसण्यासाठी असतात मात्र मजुरांना जाण्यासाठी एका डब्यात 54 जणांची व्यवस्था करण्यात आली होती . या सर्व मजुरांचे तिकिटाचे पैसे मध्यप्रदेश राज्य सरकारने रेल्वेला दिले आहेत.
1172 मजुरांना घेवून श्रमिक विशेष रेल्वे दौंड स्थानकातून ग्वाल्हेरकडे रवाना - ग्वाल्हेर श्रमिक स्पेशल ट्रेन
पुणे परिसरात अडकलेल्या ११७२ मजुरांना घेऊन श्रमिक स्पेशल ट्रेन मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला रवाना झाली.
migrant laborers
त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या मजुरांना फक्त तिकीट देण्यात आले. हे मजूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट चेक करून एका रांगेत त्यांचे स्क्रिनिंग करन्यात आले. यावेळी या मजुरांना दौंड तहसीलच्यावतीने फूड पॅकेट व पाणी बॉटल देण्यात आले. ही रेल्वे गाडी दौंडवरून ग्वाल्हेर जाणार आहे. ती गाडी आज 11 मे रोजी सकाळी 10 वाजता ग्वाल्हेर स्थानकात पोहचणार आहे.