महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकवस्तीत येऊन बिबट्या लढतोय जीवन-मरणाची लढाई

शिकारीच्या शोधात लोकवस्तीत आलेला बिबट्याची जीवन-मरणाची लढाई सुरू आहे.

लोकवस्तीत आलेला बिबट्याची जीवन-मरणाची लढाई

By

Published : Apr 3, 2019, 6:22 PM IST

Updated : Apr 4, 2019, 4:09 AM IST

पुणे - घनदाट जंगलामध्ये मुक्तपणे संचार करणारा बिबट्या आज लोकवस्तीत येऊन स्वतःच्या जीवन-मरणाची लढाई लढत आहे. शिकारीच्या शोधात लोकवस्तीत आलेला बिबट्या ऊस शेतीलाच जंगल समजून वास्तव्य करू लागला. तिथूनच सुरू झाली बिबट्याच्या या जीवन-मरणाची लढाई. कधी शिकारीच्या शोधात तर कधी अपघातात बिबट्या व बछड्यांचा मृत्यू होणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

लोकवस्तीत आलेला बिबट्याची जीवन-मरणाची लढाई

सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या घनदाट जंगलात काही काळ वास्तव्य करुन जंगलाचा राजा असणाऱ्या बिबट्याच्या संगोपनाचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या पोटाचे खळगे भरण्यासाठी शिकारीच्या शोधात बिबट्याने लोकवस्तीचा सहारा घेतला. पाळीव प्राण्यांवर शिकारीच्या हेतूने हल्ले वाढले. त्यातच बिबट्या माणसांवरही हल्ले करु लागला आणि सुरु झाला तो मोठा संघर्ष.

उसाच्या शेतीला जंगल समजून वास्तव्य करत असताना ऊसतोडणी सुरु झाली आणि बिबट्याचे वास्तव्य धोक्यात आले आहे. त्यात चिमुकले बछडेही होरपळू लागले. तसेच शिकारी शोधात असताना खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे अपघात, विहिरीत पडून मृत्यू तर कधी घातपात अशा घटना आजही वाढत चालल्या आहेत.

तर दुसरीकडे माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राच्या मदतीने ५४ बछड्यांना आईच्या कुशीत सोडण्याचे काम केले. हे बिबट निवारा केंद्र बिबट्यांच्या संगोपनासाठी दिवसरात्र काम करत आहे. तरी बिबट्यांचे मृत्यू वाढतच आहे.

जंगलवस्तीचा राजा लोकवस्तीत येऊन स्वतःचे व बछड्यांचे संगोपन कसे करणार, असा प्रश्न समोर आहे. असे असताना वनविभागाकडून तातडीच्या मदतीच्या उपाययोजना होत नाही. त्यामुळे सध्या बिबट्या संकटात सापडत चालला आहे.

Last Updated : Apr 4, 2019, 4:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details