महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट; प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या टिपल्या जातात हालचाली, घेतली जाते 'अशी' खबरदारी - लेटेस्ट कोरोना न्यूज पुणे

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या सर्व प्राण्यांचीही विशेष खबरदारी घेतली जात आहे. या प्राण्यांच्या दररोजच्या हालचाली टिपून ठेवल्या जात आहेत. ज्या ठिकाणी या प्राण्यांना ठेवले जाते, त्यांचा वावर असलेला परिसर निर्जंतूक करण्यात आला आहे.

Zoo
पाण्यात खेळताना संग्रहालयातील वाघ

By

Published : May 24, 2020, 12:23 PM IST

पुणे- दोन महिन्यांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. देशभरातील प्राणिसंग्रहालय या काळात बंद आहेत. या काळात प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची काळजी घेतली जात आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात, याची माहिती उपसंचालक डॉ. निघोटे यांनी दिली आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने प्राणिसंग्रहालयाचे उपसंचालक डॉ. निघोटे यांच्याशी साधलेला संवाद खास वाचकांसाठी. . . .

कोरोना इफेक्ट; प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या टिपल्या जातात हालचाली, घेतली जाते 'अशी' खबरदारी

पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय 130 एकर परिसरात पसरले आहे. यात वाघ, सिंह, बिबटे, हत्ती यासारख्या 63 प्रजातींचे 440 हुन अधिक वन्यप्राणी आहेत. या सर्व प्राण्यांचे दरवर्षी लसीकरण केले जाते. दर तीन महिन्यांनी या प्राण्यांना जंतनाशक औषधं दिली जातात. विष्ठा तपासली जाते. येथील प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 100 हुन अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या सर्व प्राण्यांचीही विशेष खबरदारी घेतली जात आहे. या प्राण्यांच्या दररोजच्या हालचाली टिपून ठेवल्या जात आहेत. ज्या ठिकाणी या प्राण्यांना ठेवले जाते, त्यांचा वावर असलेला परिसर निर्जंतूक करण्यात आला आहे. जे कर्मचारी रेड झोन परिसरात राहण्यास आहेत, त्यांना रजा देण्यात आली. येथील प्राण्यांना दररोज दीड टन खाद्यपदार्थ लागतात. प्राण्यांना फिडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्क्रिनिंग केल्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिला जातो. प्राण्यांच्या खाद्यांना हात लावण्यापूर्वी हॅन्ड ग्लोज वापरणे, फेस मास्क वापरणे, गम बूट वापरणे, हात साबणाने धुणे हे सर्व केल्यानंतरच त्यांना प्राण्यांजवळ जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांची वाहने, खाद्यपदार्थ घेऊन येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही.

प्राणी संग्रहालयाचे उपसंचालक डॉ नवनाथ निघोटे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्राण्यांची निगा राखताना आम्ही प्रामुख्याने तीन गोष्टी पाळल्या. प्राण्याची काळजी व्यवस्थित झाली पाहिजे, प्राण्यांना हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी आणि त्यानंतर प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण. प्राण्यांना हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे घरी घालण्याचे कपडे आणि प्राणिसंग्रहालयात घालण्याचे कपडे वेगवेगळे आहेत. प्राणिसंग्रहालयातील कपडे ते घरी घेऊन जात नाहीत. प्राणिसंग्रहालयात आल्यानंतर प्रत्येक कर्मचारी अंघोळ केल्यानंतरच प्राण्यांच्या जवळ जातो. याशिवाय कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोव्ह्ज या सुरक्षेसाठी लागणाऱ्या वस्तू पुरवल्या जात आहेत. अशाप्रकारे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर येथील प्राण्यांची निगा राखली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details