महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना

ज्या गावात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, अशा पुणे जिल्ह्यातील 128 गावांमध्ये हायअलर्ट लागू करण्यात आला आहे आणि उर्वरित सर्व गावांमध्ये अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, अशा पद्धतीचे नियोजन करुन ज्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, त्या भागात योग्य नियोजन करुन रुग्णवाढ कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

By

Published : May 13, 2021, 5:26 PM IST

कोरोना नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना
कोरोना नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना

पुणे -पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नवीन कोरोना रुग्णांची दररोज आकडेवारी कमी होत आहे. मात्र, ग्रामीण भागात दररोजच्या नव्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागली आहे. पुणे जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने ही रुग्णसंख्या वाढत असून जिल्ह्यात येत्या आठ दिवसात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.

इतक्या ग्रामपंचायती आहेत हॉटस्पॉट

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या ही स्थिर असून मागील आठवड्यात 30 टक्के चाचण्यांमध्ये वाढ केल्याने ही रुग्णसंख्या वाढत आहे. पुणे जिल्ह्यात 1404 ग्रामपंचायत आणि 16 नगरपालिका आहे. यातील फक्त 250 ग्रामपंचायतीमध्ये हॉटस्पॉट असल्याने तिथे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात हायअलर्ट आणि अलर्ट गाव घोषित करण्यात आले आहे. ज्या गावात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, अशा पुणे जिल्ह्यातील 128 गावांमध्ये हायअलर्ट लागू करण्यात आले आहे आणि उर्वरित सर्व गावांमध्ये अलर्ट जाहीर करण्यात आले आहे, अशा पद्धतीचे नियोजन करून ज्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, त्या भागात योग्य नियोजन करून रुग्णवाढ कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोरोना नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना
काय आहे गावांची स्थिती?

राज्यात सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद दुसऱ्या लाटेत पाहायला मिळत आहे. अनेकठिकाणी ऑक्सिजनची कमतरता तर काही ठिकाणी रुग्णांना बेड न मिळाल्याने रुग्णांनी प्राण गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट भयावह असताना पुणे जिल्ह्यातील 450 पेक्षा अधिक गावात एकही रुग्ण नाही, तर 700 पेक्षा अधिक गावात काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात येत असलेले नियोजन आणि त्या भागातील नागरिकांकडून होत असलेली नियमांची अंमलबजावणी, यामुळे पुणे जिल्ह्यातील काही गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

'पुढच्या आठ दिवसात होणार मोठी घट'

जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून यात सर्वाधिक आरटीपीसीआर टेस्टिंग केली जात आहे. जास्तीत जास्त लसीकरण आणि जास्तीत जास्त विलगीकरण केल्याने लवकरच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात येईल, तसेच आठ दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात 25 लाख लसीकरण

पुणे जिल्ह्यात 597 विविध केंद्रावर लसीकरण होत आहे. 45 वर्षापुढील लोकांना आणि 18 ते 44 वर्षावरील लोकांना विविध केंद्रावर लस दिली जात आहे. जिल्ह्यात एकूण 25 लाखांपेक्षा अधिक लोकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आले आहे. जास्तीत जास्त लसीकरण कशा पद्धतीने करता येईल, याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे.

हेही वाचा-देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना मॉडर्नाची लस कशी दिली जाते - नवाब मलिकांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details