महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात पहिल्यांदाच 'आईसक्रीम थाळी', खास 'या' थाळीसाठी होते ग्राहकांची गर्दी - आईस्क्रीम थाळी

किरण साळुंखे आणि गणेश गोसावी या दोन मित्रांनी एकत्र येत हे पार्लर सुरू केले आहे. आईसक्रीमचे विविध प्रकार या दुकानात चाखायला मिळतात. या पार्लरचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारी 'आईस्क्रीम थाळी'.

पुण्यात पहिल्यांदाच 'आईसक्रीम थाळी'

By

Published : Apr 2, 2019, 8:22 PM IST

Updated : Apr 2, 2019, 9:51 PM IST

पुणे - उन्हाळा म्हटलं की, सूर्याचे तळपते रूप आणि सर्वत्र उन्हाचा तडाखा पाहायला मिळतो. मात्र, गरम वातावरणात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना अल्हाददायक थंडावा देणारा पदार्थ म्हणजे आईसक्रीम. ऋतू कुठलाही असो, आईसक्रीमला नाही म्हणाणाऱ्या व्यक्ती क्वचितच सापडतील. त्यामुळे भल्याभल्यांना आईसक्रीमची क्रेझ असल्याचे पाहायला मिळते. पुण्यात आईसक्रीम पार्लरची संख्या फार मोठी आहे. या सर्व पार्लर्ससमोर आईस्क्रीम खाण्यासाठी आबालवृद्धांची सतत गर्दी असते. 'किगा आईसक्रीम पार्लर' हे येथील प्रसिद्ध आईसक्रिम पार्लर आहे. येथे आईसक्रीम खवय्यांसाठी चक्क 'आईसक्रीम थाळी'च सुरू झाली आहे.


पुण्यातील बाजीराव रस्त्यावर मागील सहा महिन्यांपासून हे आईसक्रीम पार्लर खवय्यांच्या सेवेत आहे. किरण साळुंखे आणि गणेश गोसावी या दोन मित्रांनी एकत्र येत हे पार्लर सुरू केले आहे. आईसक्रीमचे विविध प्रकार या दुकानात चाखायला मिळतात. या पार्लरचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारी 'आईस्क्रीम थाळी'.

पुण्यात पहिल्यांदाच 'आईसक्रीम थाळी'


'पेशवाई थाळी', 'क्लासिक थाळी', 'बाळराजे थाळी', 'चॉकलेट थाळी' आणि 'उपवास थाळी', असे थाळीचे पाच प्रकार येथे चाखायला मिळतात. 'पेशवाई थाळी' आणि 'चॉकलेट थाळी'मध्ये वेगवेगळ्या आईस्क्रीमच्या आठ डिश आहेत. तर, बच्चेकंपनीसाठी खास 'बाळराजे थाळी' आहे. याशिवाय पुरणपोळी, साजूक तुपातले उकडीचे मोदक, पाणीपुरी, शाही मेवा खीर, शाही गुलकंद, तिळगुळ, बदाम रॉयल क्रीम, गाजर बदाम हलवा, स्पेशल मँगो मस्तानी, स्पेशल ड्रायफ्रुटस या वेगवेगळ्या फ्लेव्हर्समध्येही आईस्क्रीम चाखायला मिळतात.
गणेश गोसावी सांगतात, आमच्याकडे असलेली पेशवाई थाळी ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. ही थाळी खाण्यासाठी दररोज सायंकाळी ग्राहकांची गर्दी होते. चविष्ट आणि खिशाला परवडणारे आईस्क्रीम असल्याने आमच्याकडे ग्राहकांची नेहमीच गर्दी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Apr 2, 2019, 9:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details