महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

असा एक लग्नसोहळा ज्यात सफाई कर्मचाऱ्यांना मानसन्मान.. - पुण्यात कोरोनात लग्न

कोरोनावर मात करण्यासाठी दिवस रात्र लढत देवदूत बनलेल्या डॉक्टर, नर्स, सफाई कामगार व प्रशासन यांचे आभार मानत त्यांना सॅनिटायजर व मास्क देऊन सत्कार केला.

लग्नसोहळा
लग्नसोहळा

By

Published : May 19, 2020, 11:33 PM IST

पुणे - सद्यस्थितीला सगळीकडेच कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा उपाय करून कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. याचेच ताजे उदाहरण म्हणजे, सिंहगड रस्त्यावरील जाधवनगर येथील वडगाव बुद्रुकमध्ये राहणाऱ्या कवडे कुटुंबीयांनी आज समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

घरात लग्नाचा योग आला होता, परंतु कोरोनामुळे सगळे नियोजन बिघडले. थाटामाटात साजरे होणारे लग्न मात्र थांबले नाही. या कुटुंबाने नातेवाईक आणि आप्तस्वकीयांच्या सहवासात लग्न करण्याचे ठरवले होते. परंतु, कोरोनामुळे भावनिक निराशा झाली असली तरी सामाजिक भान ते विसरले नाहीत. त्यामुळे वर चि. अभिषेक कवडे व नववधू चि.सौ.का आरती शिंदे यांचे लग्न थाटात न करता अगदी साधेपणाने कवडे यांच्या राहत्या घरासमोर पार पाडण्यात आले.

राज्य नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनामुळे जैविक संकट ओढवले आहे. अशावेळी या कुटुंबीयांनी घरच्या घरी लग्नसोहळा केला. शिवाय कोरोनावर मात करण्यासाठी दिवस रात्र लढत देवदूत बनलेल्या डॉक्टर, नर्स, सफाई कामगार व प्रशासन यांचे आभार मानत त्यांना सॅनिटायजर व मास्क देऊन सत्कार केला. तसेच यात भर म्हणून यावेळी कवडे कुटुंबीयांकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 51 हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला. सफाई कामगार महिलांना साडी चोळी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते, सफाई कामगार महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details