महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rajiv Gandhi Zoological Park : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उन्हापासून बचावासाठी प्राण्यांसाठी खास सोय - प्राण्यांची अशी घेतली जात आहे काळजी

सध्या राज्यतील तापमान पाहिले, तर सकाळी अकरानंतर आपल्याला बाहेर पडणे कठीण असते. आपण थंड पाणी किंवा सावली शोधतो. मात्र, या मुख्या प्राण्यांना बोलता येत नसल्याने त्यांची काळजी प्राणी संग्रहालय चांगल्या प्रकारे करत आहेत. कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता उन्हाळ्याच्या सुटीमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

Rajiv Gandhi Zoological  Park
राजीव गांधी प्राणी संग्रहालय

By

Published : Apr 27, 2023, 9:55 PM IST

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात प्राण्यांची अशी घेतात काळजी

पुणे: राज्यासह पुणे शहरात देखील यंदाच्या उन्हाळ्यात जरी अवकाळी पाऊसाचा अनुभव आला असला तरी, दिवसा मोठ्या प्रमाणावर उन्हाचा चटका हा बसताना पाहायला मिळत आहे. उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी लोकांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे.अश्यातच प्राण्यांना देखील उन्हाचा चटका बसू नये म्हणून पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहे.

प्राण्यांचे उन्हापासून संरक्षण: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 67 प्रकारचे सुमारे 400 प्राणी असून सर्व प्राण्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी आता संग्रहालय प्रशासनाकडून प्राण्यांना दिवसातून दोन वेळ अंघोळ, कुलर, वॉटर फॉगर, पाण्याचे हौद, अशी व्यवस्था करण्यात आली आहेत. याबाबत प्राणी संग्रहालयातील हेड शामराव खुडे म्हणाले की, उष्णतेचा प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही कुलर, वॉटर फॉगर, पाण्याचे हौद तयार केले आहे. उन्हाच्या चटक्याच्या वेळी या प्राण्यांना पाईपद्वारे पाणी मारले जाते. तसेच जर लाईट नसेल तर हाताने फवारे मारले जाते. तसेच प्राण्यांच्या खाण्याच देखील विशेष लक्ष दिले जाते. उन्हाळ्यात अस्वलला दिवसाला एक आईस केक खायला दिले जातो.



थंड पाण्याचे सप्रिंकल: उन्हाळ्यात प्राणी संग्रहालयात प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. प्राण्यांना तापमानानुसार थंडावा कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले जात आहे. हत्तीला दिवसातून दर दोन वेळेमध्ये अंघोळ घातली जाते. वाघांच्या पिंजऱ्यात देखील फॉगर्स द्वारे पाणी सोडले जाते. हत्ती असेल वाघ असेल किंवा बिबट्या आणि अस्वल यांना देखील उन्हाच झळ बसू नये म्हणून थंड पाण्याचे सप्रिंकल लावण्यात आले आहेत. बिबट्या, साळिंदर, सांबर, नीलगाय, हरणांच्या खंदकांमध्ये स्प्रिंकलर्स द्वारे पाण्याचे मारा केला जात आहे. तसेच गवतावर सातत्याने पाण्याचा शिडकाव होत असल्याने प्राण्यांना उन्हाचा त्रास होत नाही.

हेही वाचा:Maharashtra Weather Update राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता काही भागात गारपिटीचा जोर वाढण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details