पुणे - जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कानसे शिणोली गावात एका गाईने २ तोंडे असणाऱ्या वासराला जन्म दिला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या वासराला पाहाण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत.
ऐकलं का.. गाईने दिला दोन तोंडे असणाऱ्या वासराला जन्म - शिणोली आंबेगाव पुणे
शेतीला जोडव्यवसाय म्हणून देविदास दाते यांच्या गोठ्यात गाईंचे संगोपन केले जाते. ४ दिवसांपासून गाई वासराला जन्म देण्यासाठी तडफडत होती. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी गाईची तपासणी केली असता गाईच्या पोटात २ तोंड असणारे वासरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या गाईने २ तोंडे त्याचबरोबर ४ डोळे, ४ शिंगे असणाऱ्या गोंडस अशा या वासराला जन्म दिला.
![ऐकलं का.. गाईने दिला दोन तोंडे असणाऱ्या वासराला जन्म](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2886722-535-2c037169-9c26-4f50-8697-d4d6fdb5575d.jpg)
शेतीला जोडव्यवसाय म्हणून देविदास दाते यांच्या गोठ्यात गाईंचे संगोपन केले जाते. ४ दिवसांपासून गाई वासराला जन्म देण्यासाठी तडफडत होती. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी गाईची तपासणी केली असता गाईच्या पोटात २ तोंड असणारे वासरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या गाईने २ तोंडे त्याचबरोबर ४ डोळे, ४ शिंगे असणाऱ्या गोंडस अशा या वासराला जन्म दिला. या वासराच्या सर्व तपासण्या केल्या असून वासरू शारीरिक दृष्ट्या प्रबळ आहे. मात्र, या वासराच्या जन्माने संपूर्ण परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अशाप्रकारच्या घटना बघितल्या की 'देवाची कर्णी अन् नाराळात पाणी' या म्हणीची आठवण होते. जग चंद्रावर चालले असताना आजही या पृथ्वी तलावर अशा घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. मात्र, अलीकडच्या काळात अनेक गाई, म्हशींच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल झाल्याने, असे वासरू जन्माला आल्याचे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले.