पुणे - भारताच्या मिशन चांद्रयान-२ मोहिमेला अवघा काही वेळ शिल्लक असताना ते रद्द करण्यात आले. देशासह संपूर्ण जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले होते. ही मोहीम यशस्वी झाली असती तर अनेक प्रयोग यशस्वी झाले असते. मात्र, शास्त्रज्ञांनी रात्री एक तास आधी येऊन काही तांत्रिक कारणामुळे ही चांद्रयान मोहीम रद्द केली असल्याचे सांगितले.
चांद्रयान-२ मोहीम लवकरच पुन्हा राबविण्यात येईल - विज्ञान प्रसारक लीना बोकील - भारत
देशासह संपूर्ण जगाचे लक्ष मिशन चांद्रयान-२ मोहिमेकडे लागले होते. परंतु, या मोहिमेला अवघा काही वेळ शिल्लक असताना ते रद्द करण्यात आले. यासंदर्भात माहिती दिली आहे, विज्ञान प्रसारक लीना बोकील यांनी.
यासंदर्भात नेमके कारण कळू शकले नाही. त्यामुळे येणाऱ्या २० ते २५ दिवसात परत यासाठी प्रयत्न करण्यात येईल. जास्त मोठे तांत्रिक कारण नसण्याची शक्यता आहे. या मोहिमेमुळे चंद्रावर पाणी आहे का नाही, इतर काही खनिजे आहेत का याचाही शोध लागणार होता.
चांद्रयान-२ हे मोहीम ९०० कोटी पेक्षा जास्त रुपये खर्चून करण्यात येत आहे. यासाठी जवळपास ११ वर्ष अनेकजण काम करत आहेत. याचा फायदा आपल्या देशासह इतरांनाही होणार आहे. त्यामुळे आता यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. याविषयी माहिती दिली आहे विज्ञान प्रसारक लीना बोकील यांनी.