महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केरळच्या वायनाडमध्ये भारतीय लष्कराची तुकडी रवाना, कर्नाटकसह महाराष्ट्रात मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू - पावसाचे थैमान

सध्या पश्चिम भारताच्या विविध भागांत पावसाने थैमान घातले आहे. लष्कराच्यावतीने बचाव कार्य वेगात सुरू आहे. दक्षिण मुख्यालयाने महाराष्ट्र आणि कर्नाटक नंतर केरळच्या वायनाडमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी तुकडी पाठवण्यात आली आहे.

केरळच्या वायनाडमध्ये भारतीय लष्कराची तुकडी रवाना, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू

By

Published : Aug 8, 2019, 6:33 PM IST

पुणे - भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने महाराष्ट्र आणि कर्नाटक नंतर केरळच्या वायनाडमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी तुकडी पाठवली आहे. संरक्षण विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत लष्कराने एकूण 3500 नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले आहे.

केरळच्या वायनाडमध्ये भारतीय लष्कराची तुकडी रवाना, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू
कोल्हापूरच्या कोवाड गावातील गर्भवती महिला व 24 नागरिक 72 तासंपासून पूराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना लष्कराच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले आहे. त्याप्रमाणेच बेळगावच्या मुदगली तालुक्यातील मासागुप्पी गावात 15 फूट खोल पाण्यात एक महिला अडकली होती. भारतीय लष्कराच्या मेजर राजपाल सिंग राठोड यांनी त्यांना पाठीवर बसवून स्वतः पोहून पुराच्या पाण्यातून त्यांना बाहेर काढले. दरम्यान, राजस्थानच्या जोधपूरमधून लष्कराच्या अभियंत्यांच्या विशेष तुकडीला बेळगावमध्ये पाठवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details