पुणे -दुष्काळानंतर पावसाने यावर्षी बळीराजाला चांगली साथ दिली. त्यामुळे रब्बी हंगामात डोंगराळ व जिरायत भागात ज्वारीची लागवड पुणे जिल्ह्यात सर्वाधिक झाली. मात्र, सध्याच्या वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे पीक अडचणीत आले आहे. ज्वारी पिकावर करपा व चिटका रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पुणे जिल्ह्यात 'ज्वारीचे पीक' सर्वाधिक रोगराईच्या संकटात हेही वाचा... अजित पवार म्हणतात... 'तिथं सुरू झालं म्हणजे इथं सुरू करा' असं नसतं
जनावरांचा चारा व धान्य मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल, या आशेने रब्बी हंगामात डोंगराळ व जिरायत शेतीत मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड करण्यात आली. मात्र, सध्याची थंडी व वातावरणातील धुक्यामुळे ज्वारीचा दाणा भरलाच नाही. तर याऊलट ज्वारीची वाढही कमी जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच उपाययोजना करण्याचे आवाहन, कृषी विभाकडुन करण्यात आले आहे.
जनावरांच्या चारा व धान्यासाठी ज्वारी हे महत्वाचे पीक मानले जाते. मात्र, सध्या सततच्या ढगाळ हवामानामुळे हेच ज्वारी पीक धोक्यात आले. ज्वारी वरती तांबेरा, चिकटा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ज्वारीला ऐन मोसमात दाणेच भरत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
हेही वाचा... शिर्डी-पाथरी वाद : नाना पटोलेंची प्रतिक्रिया...
पुणे जिल्ह्यात जवळपास 2 लाख 924 हेक्टर क्षेत्रापैकी 1 लाख 52 हजार 240 हेक्टर वर ज्वारीचे उत्पन्न घेतले जाते. पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यात किती हेक्टर जमीनीवर ज्वारीचे उत्पन्न घेतले जाते ते पाहूयात...
- शिरुर तालुका - 14 हजार हेक्टर
- हवेली तालुका - 363 हेक्टर
- मुळशी तालुका - 612 हेक्टर
- भोर तालुका - 11 हजार 776
- मावळ तालुका - 356 हेक्टर
- वेल्हे तालुका - 71 हेक्टर
- जुन्नर तालुका - 9 हजार 530 हेक्टर
- खेड तालुका - 12 हजार 670 हेक्टर
- आंबेगाव तालुका - 336 हेक्टर
- बारामती तालुका - 40 हजार हेक्टर
- इंदापूर तालुका - 8 हजार 906 हेक्टर
- दौंड तालुका - 5 हजार 61 हेक्टर
- पुरंदर तालुका - 20 हजार 506 हेक्टर.
हेही वाचा... अरुणास्त..! 1986 ला याच कोकणकड्यावरून अरूण सावंत यांनी काढला होता मृतदेह
डोंगराळ भागात मोठ्या कष्टातुन उभी केलेली ज्वारीची पिके, शेतकऱ्यांना धान्य तर जनावरांना चारा देते. मात्र, सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे 'ना धान्य ना चारा' अशी अवस्था झाली आहे. सततच्या अस्मानी संकटांनी पिडलेला बळीराजा सरकारच्या स्थिर धोरण नसल्याच्या कारभाराने पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे त्याला गरज आहे ती सरकारच्या मदतीची. तेव्हा येत्या काळात सरकार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी मदत करते का, हे पहावे लागेल.