पुणे - दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या वडिलांना मुलाने मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना देहू येथे घडली. संतोष विठ्ठल येळवंडे असे मृताचे नाव आहे. तर विराज संतोष येळवंडे असे आरोपी मुलाचे नाव आहे. त्याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी आई कविता संतोष येळवंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आईला त्रास देणाऱ्या दारूड्या पित्याचा मुलाकडून खून; देहूतील प्रकार - dehuroad police station pune
रविवारी मृत संतोष हे मद्यपान करून नेहमीप्रमाणे पत्नी कविता यांना मारहाण करत होते. तेव्हा आईला मारहाण करत असल्याने मुलगा विराज याने मध्यस्थी करून वडिलांना समजावले. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यानंतर त्यांच्या मुलाने संतोष यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये संतोष गंभीर जखमी झाले.
रविवारी मृत संतोष हे मद्यपान करून नेहमीप्रमाणे पत्नी कविता यांना मारहाण करत होते. तेव्हा आईला मारहाण करत असल्याने मुलगा विराज याने मध्यस्थी करून वडिलांना समजावले. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यानंतर त्यांच्या मुलाने संतोष यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये संतोष गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहे.
हेही वाचा -रेल्वे स्टेशनवरील गुगलची मोफत वायफायची सेवा होणार बंद, कारण....