पुणे -भोरगिरी येथील भोरगडाच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यात पडून एका पर्यटकांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमनाथ विठ्ठल तांगडे(वय 23 रा. वडोदतांगडे, जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पुणे : भोरगिरी येथील धबधब्यात पडून पर्यटकाचा मृत्यू - सोमनाथ विठ्ठल तांगडे
भोरगडाच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यात पडून एका पर्यटकांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमनाथ विठ्ठल तांगडे(वय 23 रा. वडोदतांगडे, जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. पाण्याच्या बाजुला असणारा खडक निसरडा असल्याने सोमनाथ पाय घसरुन पाण्यात पडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने सोमनाथचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे.
सोमनाथ हा तरुण काही मित्रांसमवेत भोरगिरी येथे फिरायला आला होता. आज सकाळपासुन हे सर्व पर्यटक भोरगड,कोटेश्वर अशा सर्व परिसरात फिरुन आल्यानंतर भोरगडाच्या पायथ्याला असणाऱ्या धबधब्यावर आले होते. पाण्याच्या बाजुला असणारा खडक निसरडा असल्याने सोमनाथ पाय घसरुन पाण्यात पडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने सोमनाथचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे.
भिमाशंकर आणि भोरगिरी परिसरात निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. मात्र, आनंदाच्या भरात धोकादायक ठिकाणाकडे दुर्लक्ष करतात. परिसरात एकीकडे पर्यटन वाढत आहे. मात्र, या पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांना आपातकालीन वेळी या परिसरात कुठल्याही सुविधा मिळत नाहीत.
TAGGED:
Bhorgiri waterfall accident