पुणे -नव्याने शिक्षणमंत्री पदाचा भार स्वीकारलेल्या आशिष शेलार यांचा आज पुण्यात पहिला जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हेल्दी ग्लोब स्मार्ट व्हर्चुअल एज्युकेशन या शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त आज ते व्यासपीठावर होते. यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना काही संतप्त पालकांनी त्यांच्यासमोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
नवनियुक्त शिक्षणमंत्र्यांच्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात पालकांचा गोंधळ; पुण्यातील प्रकार
नवनियुक्त शिक्षणमंत्री अशिष शेलार यांच्या पुणे येथे झालेल्या पहिल्याच कार्यक्रमात पालकांनी एकच गोंधळ घातले आहे. ल्पुयाच ण्यातील एका कार्यक्रमात गोंध. कार्यक्रमात त्यांचे भाषण सुरू असताना काही नागरिकांनी त्यांच्या समोर येत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
पुण्यातील हचिंग्ज स्कुलमध्ये शाळा प्रशासनाची मनमानी सुरू असल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आशिष शेलार यांचे भाषण सुरू असताना त्यांना भेटून शाळेच्या या मनमानी कारभाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना बाजूला नेत गोंधळ घालण्यापूर्वीच ताब्यात घेतले. कार्यक्रम संपल्यानंतर आशिष शेलार भेटतील असे सांगण्यात आले. परंतु कार्यक्रमानंतर शेलार यांनी काढता पाय घेतला.
दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर आशिष शेलार यांना अकरावी प्रवेशासाठी येत असलेल्या अडचणीविषयी विचारणा केली असता, शेलार यांनी काही न बोलता हात जोडत निघून जाणे पसंत केले.