पुणे- मोठ्या उत्साहात पार पडलेल्या 34 व्या पुणे मॅरेथॉन स्पर्धेत सोलोमन या धावपटूने ठसा उमटवला. पुरुष गटात इथिओपियाचा सोलोमन हा विजेता ठरला आहे. पुणे मॅरेथॉनवर नेहमीप्रमाणे यावर्षीदेखील परदेशी खेळाडूंचे वर्चस्व ठरले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक सुरेश कलमाडी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
इथिओपियाचा सोलोमन 34 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा विजेता - आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा
पुणे येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पुरुष गटातून इथिओपियाच्या सोलोमनने जिंकली.
मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धक
सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानापासून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या मॅरेथॉनला सुरुवात झाली. विविध अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य मॅरेथॉन 42 किमी, हाफ मॅरेथॉन 21 किमी, 10 किमी, व्हील चेअर अशा विविध अंतरगटांचा समावेश आहे.
Last Updated : Dec 1, 2019, 12:24 PM IST