महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तळेगाव ढमढेरेच्या सोहमची पाच देशात झाली विश्वविक्रमी नोंद - Soham Pandit Space Research Challenge

तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील सोहम सागर पंडित या अवलियाने याच्या कार्याची पाच देशात विश्वविक्रमी नोंद झाली आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस इंडिया यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्पेस रिसर्च चालेंज २०२१ उपग्रह बनविण्याच्या विश्व विक्रमात सहभागी होऊन आपले कार्य दाखविल्याने सागर याच्या कार्याची विश्वविक्रमी नोंद झाली आहे. सोहम पंडित हा शिरुर तालुक्याची नोंद इतर देशांमध्ये लावणारा अवलिया ठरला आहे.

World record entry Soham Pandit
विश्वविक्रमी नोंद सोहम पंडित

By

Published : Jun 15, 2021, 10:50 PM IST

पुणे -तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील सोहम सागर पंडित या अवलियाने याच्या कार्याची पाच देशात विश्वविक्रमी नोंद झाली आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस इंडिया यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्पेस रिसर्च चालेंज २०२१ उपग्रह बनविण्याच्या विश्व विक्रमात सहभागी होऊन आपले कार्य दाखविल्याने सागर याच्या कार्याची विश्वविक्रमी नोंद झाली आहे. सोहम पंडित हा शिरुर तालुक्याची नोंद इतर देशांमध्ये लावणारा अवलिया ठरला आहे.

माहिती देताना सोहम पंडित, पालक सागर पंडित आणि शिक्षिका माधुरी शेजवळ

हेही वाचा -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा पदवी प्रदान समारंभ, राज्यपालांची ऑनलाईन उपस्थिती

तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील सोहम सागर पंडित याने तामिळनाडू येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस इंडिया यांच्या वतीने आयोजित स्पेस रिसर्च चालेंज २०२१ या उपक्रमांतर्गत कमी वजनाचे १०० उपग्रह बनवून अवकाशात सोडण्याच्या उपक्रमात तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका माधुरी शेजवळ यांच्या प्रेरणेने सहभाग घेतला होता. या उपक्रमांतर्गत जगातील सर्वांत कमी वजनाचे २५ ते ८० ग्रॅम वजन असणारे १०० उपग्रह बनवून त्यांना ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर साइंटिफिक हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशाला गवसणी घालणाऱ्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले होते, तर जगातील सोनेरी अक्षरांनी लिहिणारा हा पहिलाच उपक्रम ठरला होता.

सदर उपक्रमामुळे हवेतील आद्रता, हवेतील प्रदूषण, तापमान, हवेतील वायूंचे प्रमाण, हवेतील प्रदूषणामुळे ओझोन वायूची होणारी हानी आणि याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तर, शिरूर तालुक्यातून एकमेव सोहम पंडित या चिमुरड्याने आपले कौशल्य दाखविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत असताना आता त्याच्या कार्याची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, असिस्टंट वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये झाली आहे. याबाबतचे प्रमाणपत्र देखील सोहम पंडित याला देण्यात आलेले असून सोहमच्या अनोख्या कार्यामुळे सोहम हा शिरूर तालुक्याचे नाव इतर देशांमध्ये पोहचविणारा सर्वात कमी वयाचा अलविया ठरला आहे.

सोहमच्या फोटोचे येणार पोस्ट तिकीट

तळेगाव ढमढेरे येथील सोहम सागर पंडित सहभागी झालेल्या या उपक्रमाची अनेक ठिकाणी नोंद झालेली असतानाच आता भारत सरकारकडून पोस्ट तिकिटावर सोहमचा फोटो छापला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोरोना काळ संपताच कार्यक्रमातून पोस्ट तिकिटाचे प्रकाशन होऊन हे तिकीट सुरू होणार असून याबाबतचे पत्र देखील सोहम पंडित याच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहे.

हेही वाचा -दत्तात्रय भरणे हेच सोलापूरचे पालकमंत्री कायम - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details