महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मिळून साऱ्याजणी'च्या संस्थापक अन् ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ

महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन झाले. आज सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ

By

Published : Jan 30, 2020, 10:52 AM IST

Updated : Jan 30, 2020, 11:36 AM IST

पुणे - महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे वृद्धापकाळाने आज गुरुवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
अनेक दिवसांपासून विद्या बाळ आजारी होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

आज दुपारी २ नंतर त्यांचे पार्थिव पुण्यातील प्रभात रोड येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यासंस्कार करण्यात येणार आहेत.

महिलांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या -
महिलांना पुरुषांप्रमाणेच समान हक्क मिळावा यासाठी विद्या बाळ यांनी आयुष्यभर संघर्ष केला. महिलांच्या प्रश्नांवर धडाडीने आवाज उठवणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. विद्या बाळ यांनी स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी नारी समता मंच या संस्थेची स्थापना केली होती. स्त्रियांना अनेक धार्मिक स्थळी प्रवेश दिला जात नव्हता. त्यासाठी विद्या बाळ यांनी उच्च न्यायालयात लढा दिला. या लढ्यामध्ये त्यांना न्याय देखील मिळाला.

'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या संस्थापक संपादक -
विद्या बाळ १९६४ मध्ये 'स्त्री' मासिकाच्या संपादक म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर १९८३ ते १९८६ मध्ये त्या पूर्ण वेळ संपादक म्हणून काम पाहत होत्या. स्त्री हे मासिक सोडल्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले. तसेच त्या संस्थापक संपादक म्हणून काम पाहत होत्या. यापूर्वी त्यांनी पुणे आकाशवाणीमध्येही काम केले होते.

विद्या बाळ यांचे लेखन -
विद्या बाळ यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी तेजस्विनी, वाळवंटातील वाट या कादंबऱ्याही लिहिल्या. सोबतच विविध विषयावर लेखन केले होते. समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार, प्रश्न आणि घटना यावर विद्या बाळ यांनी वेळोवेळी आपले स्पष्ट मत मांडले होते.

  1. संवाद
  2. कथा गौरीची
  3. तुमच्या माझ्यासाठी
  4. अपराजितांचे निःश्वास
  5. शोध स्वतःचा
  6. कमलाकी
Last Updated : Jan 30, 2020, 11:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details