पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात 21 लाखांचा गुटखा पकडण्यात सामाजिक सुरक्षा पथकाला यश आले आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने 21 लाख 85 हजारांच्या गुटख्यासह 12 लाखांचा टेम्पो असा एकूण 34 लाखांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालक झुबेर लियाकत बाडीवाले (वय 25), फरीद शामशुद्दीन शेख (वय 39) आणि आरोपी स्वामी अण्णा यांच्या विरोधात वाकड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये 21 लाखांचा गुटखा पकडला; सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई सापळा रचून आरोपींना केली अटकपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकहून नाशिकला लाखोंचा गुटखा एका टेम्पोमधून जाणार असल्याची माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना मिळाली होती. तो टेम्पो शहरातून जाणार असल्याचे समजले होते. त्यानुसार वाकड परिसरातील रोझवूड हॉटेल परिसरात सापळा लावून पोलीस कर्मचारी दबा धरून बसले होते. तेव्हा, टेम्पो येताच त्याला थांबवून पाहणी केली. त्यात लाखोंचा गुटखा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये 21 लाखांचा गुटखा पकडला हेही वाचा -पाच देशी मॅगझीन, १५ जिवंत काडतुसांसह एकजण पोलिसांच्या ताब्यात
टेम्पोमधून मिळाला 21 लाखांचा 85 हजारांचा गुटखा; टेम्पो ही केला जप्त
टेम्पोमधून 21 लाख 85 हजारांचा गुटखा, 12 लाख 15 हजार रुपयांचा टेम्पो, 12 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि लोखंडी कोयता तसेच रोख रक्कम असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे
या पोलिसांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, नितीन लोंढे, पोलीस नाईक अनिल महाजन, पोलीस नाईक महेश बारकुले, पोलीस नाईक अमोल शिंदे, पोलीस नायक संगीता जाधव, पोलीस कर्मचारी मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे यांनी केली आहे.
हेही वाचा -मुंबईत एनसीबीकडून 6 किलो चरस जप्त, तिघांना अटक