महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 9, 2020, 5:02 PM IST

ETV Bharat / state

कुठेही भाजप 'ईडी'चा वापर करते, 'ईडी'च भाजपला संपवेल - धनंजय मुंडे

ईडीच भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरूनदेखील केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

पुणे- एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून सहकाऱ्यापर्यंत जायचे आणि कुठेही गेले की, ईडीचा वापर करायचा. ही ईडीच भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरूनदेखील केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुणे

धंनजय मुंडे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून सहकाऱ्यांपर्यंत जायचे आणि कुठं ही गेलं की ईडीचा वापर करायचा. हे अनेक दिवसांपासून चालले आहे, ईडीच भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही, हे माझे वाक्य तुम्ही लिहून घ्या, असे ते म्हणाले.

हे सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या विरोधातील

पुढे ते म्हणाले की, हे सरकार शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या विरोधातील आहे. सुरुवातीला विश्वास देत की, आम्ही तुमच्या हृदयात आहोत. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ, पुन्हा तेच सरकार सत्तेत आल्यानंतर त्याच शेतकऱ्याला, शेतमजुराला अनेक कामगारांना पायाखाली तुडवते, त्याचा प्रत्येय सध्या येतोय. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा केला आहे, तो शेतकऱ्यांना संपविणारा आहे. शेतकरी संपणार असेल तर खऱ्या अर्थाने शेती प्रधान देश हा संपेल, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, जी गावे जातीवाचक संबोधली जातात आणि ती नोंदणीकृत आहेत. ती गावे नोंदणीतून निघाली पाहिजेत हा प्रस्ताव समोर आणला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details