महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!... रेशन दुकानाबाहेर गर्दी - corona virus news

चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर इथे आज सकाळी रेशन दुकानावर मोठी रांग लागली. कोरोना संसर्गजन्य विषाणू असून अंतर न ठेवल्यास हा विषाणू पसरू शकतो. असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन केले. परंतु, तसे होताना दिसत नाही.

social-distance-rule-not-fallow-in-pune
social-distance-rule-not-fallow-in-pune

By

Published : Apr 11, 2020, 12:10 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रेशन दुकानाच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका, गर्दीच्या ठिकणी सुरक्षित अंतर ठेवून थांबा, असे सांगितले जात आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.

रेशन दुकानाबाहेर गर्दी

हेही वाचा-#लाॅकडाऊन: वाहतूक ठप्प..! राज्यातील वाहनचालकांवर उपासमारीची वेळ

चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर इथे आज सकाळी रेशन दुकानावर मोठी रांग लागली. कोरोना संसर्गजन्य विषाणू असून अंतर न ठेवल्यास हा विषाणू पसरू शकतो. असे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले. परंतु, तसे होताना दिसत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details