पिंपरी चिंचवड -पिंपरी-चिंचवडमध्ये एक आगळावेगळा व्हेंलनटाईन डे साजरा करण्यात आला. अदिती निकम यांनी तृतीयपंथी यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत आणि धान्याची किट देऊन हा व्हॅलेन्टाईन साजरा केला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या अशाच प्रकारे प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणाऱ्या व्हॅलेन्टाईन दिवशी उपक्रम राबवत आहेत.
तृतीयपंथी यांना वेगळ्या नजरेतून न पहाता ते समाजातील एक घटक आहेत. त्यांना समान वागणूक द्यायला हवी. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यामुळेच त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी गेली पाच वर्षे झाले तृतीयपंथी यांच्यासोबत व्हॅलेन्टाईन डे साजरा करत आहे, अशी प्रतिक्रिया अदिती निकम यांनी दिली आहे. तृतीयपंथी यांना देखील आपल्यासारख मन आहे. त्यांना देखील प्रत्येक प्रकारचे डे साजरे करण्याचा अधिकार आहे. त्यांना समजून घेऊन त्यांचा तिरस्कार न करता आपलसे करायला हवे, अस मत अदिती निकम यांनी व्यक्त केले आहे.
पिंपरीत तृतीयपंथी यांच्यासोबत अनोखा 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा
अदिती निकम यांनी तृतीयपंथी यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत आणि धान्याची किट देऊन हा व्हॅलेन्टाईन साजरा केला आहे.
अदिती निकम