पुणे - कोरोना व्हायरससंदर्भात अफवा पसरवणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक करा, अशा मागणीचे निवेदन घेऊन आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवरच संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून पोलिसांकडे निवेदन घेऊन जाणे, ही बाब संचारबंदीमध्ये येत नसल्याचा ठपका ठेवत बंडगार्डन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी भिडेंना अटक करा; निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्यावरच संचारबंदी उल्लंघनाचा गुन्हा दाखल - social activist
हेमंत बाबुराव पाटील (50) असे गुन्हा दाखल झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. पाटील हे 'भारत अंगेंस्ट करप्शन' संघटनेचे अध्यक्ष आहेत.
हेमंत बाबुराव पाटील (50) असे गुन्हा दाखल झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. पाटील हे 'भारत अंगेंस्ट करप्शन' संघटनेचे अध्यक्ष आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना बरे करण्यासंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र घेऊन हेमंत पाटील बुधवारी (दि. 1) दुपारी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेत गेले होते.
नागरिकांनी संचारबंदीच्या कालावधीत अशाप्रकारे पत्र घेऊन पोलिसांकडे येणे ही बाब संचारबंदीमध्ये सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेत येत नाही. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन केल्याने पाटील यांच्यावरच भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत.