महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : साप आणि मांजराचा संघर्ष, मांजराने 2 तास नागाला अडवून ठेवले - नाग आणि मांजराचा संघर्ष

राजगुरूनगर येथील वृंदावन सोसायटी जवळील मोकळ्या जागेत शनिवारी सायंकाळी विषारी नाग निघाला होता. या ठिकाणी तीनही बाजूकडून सोसायट्या आणि घरे आहेत. नाग निघाल्याची चाहूल मांजराला लागल्याने मांजराने त्यास रोखून धरले.

Rajgurunagar
साप आणि मांजराचा संघर्ष

By

Published : Mar 15, 2020, 11:32 AM IST

पुणे- राजगुरुनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नाग आणि मांजराचा संघर्ष पाहायला मिळाला. मांजराने नागाला 2 तास अडवून ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तर नागाला अडवून ठेवणाऱ्या या मांजराचे सर्वांनी कौतुक केले आहे.

साप आणि मांजराचा संघर्ष

हेही वाचा -'गो कोरोना गो...', जीवघेण्या विषाणूवर उत्कर्ष शिंदेचं गाणं

याबाबत अधिक माहिती अशी की, राजगुरूनगर येथील वृंदावन सोसायटी जवळील मोकळ्या जागेत शनिवारी सायंकाळी विषारी नाग निघाला होता. या ठिकाणी तीनही बाजूकडून सोसायट्या आणि घरे आहेत. नाग निघाल्याची चाहूल मांजराला लागल्याने मांजराने त्यास रोखून धरले. यावेळी नाग आणि मांजर यांच्यात संघर्ष झाला. मांजर नागाला इकडे-तिकडे जाऊ देत नव्हते, तर नाग तेथून जाण्याचा प्रयत्न करत होता.

हेही वाचा -पुण्यातील लाकडी फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग; जीवितहानी नाही

त्यानंतर मांजराच्या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. नागरिकांनी तत्काळ याची माहिती सर्प मैत्रिणीला दिली. नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे मांजर तेथून निघून गेल्यानंतर नागही एका बिळात लपून बसला. त्यावेळी सर्प मैत्रिण प्रिया थोरात यांनी बिळात पाणी सोडल्यानंतर नाग बाहेर आला. त्यानंतर प्रिया थोरात यांनी नागाला पकडून जंगलात सोडून दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details