महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात 'दो धागे श्रीराम के लिए' कार्यक्रम; खुर्च्या मात्र रिकाम्याच, गर्दी नसल्यानं स्मृती इराणी मंचावरून परतल्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Smriti Irani Smriti Irani : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा ‘दो धागे श्रीराम के लिए' हा Do (Dhaage Shriram Ke liye ) कार्यक्रम १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यात होत आहे. पुण्यातल्या गुडलक चौकात हे धागे विणण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला दोन धागे विणण्याचे आवाहन करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

Smriti Irani
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 9:09 PM IST

Updated : Dec 10, 2023, 9:48 PM IST

पुण्यात कार्यक्रमात सगळ्याच खुर्च्या रिकाम्या

पुणेSmriti Irani: 22 जानेवारी 2024 रोजी रोजी भव्य अशा राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या रामासाठी लागणारे वस्त्र पुण्यातून जाणार आहे. त्यासाठी पुण्यात 'दो धागे श्रीराम के लिए' कार्यक्रम (Do Dhaage Shriram Ke liye) आयोजित करण्यात आला आहे. आजपासून वस्त्र विण्यास सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचं चित्र पुण्यात दिसलं नाही. भाजपाचा ड्रीम प्रोजेक्ट आणि आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या, श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नसल्याने मोठी नामुष्की झाल्याचं चित्र पुण्यात दिसलं.

कार्यक्रमात सगळ्याच खुर्च्या रिकाम्या : पुण्यातील प्रत्येकाचा हातभार श्री रामाचे वस्त्र तयार करण्यासाठी लागावा. श्रीराम मंदिरामध्ये योगदान असावं यासाठी श्रीरामांचे वस्त्र पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या अनघा घैसास यांच्या हॅण्डलूम संस्थेककडून तयार करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), गोविंदगिरी महाराज, संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी असे मान्यवर उपस्थित होते. परंतु मुख्य कार्यक्रम हा धागे विणण्याचा गुडलक चौकात झाल्यानंतर, याचं कार्यक्रमाची सभा पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये ग्राउंडवर ठेवण्यात आली होती. या कॉलेजमध्ये स्मृती इराणी आल्या त्या ठिकाणच्या सगळ्याच खुर्च्या रिकाम्या असल्याने, त्या परत दिल्लीला निघून गेल्या. त्यामुळं याची जोरात चर्चा सुरू आहे.

130 देशांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित :अयोध्येत भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होत आहे. या दिवशी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. (Ram Mandir Ayodhya) प्राणप्रतिष्ठेपूर्वी एक आठवडा आधीपासूनच पूजा-अर्चा सुरू होणार आहे. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला 130 देशांचे प्रतिनिधी, साधू, महंत अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराचं 22 जानेवारीला सकाळी उद्घाटन होणार आहे. मंदिर लोकार्पणाचा जवळपास सात दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. हा सोहळा झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी राम मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. (Dedication ceremony of Ram Mandir)

हेही वाचा -

  1. राम मंदिर लोकार्पण दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा - महंत अनिकेतशास्त्री
  2. अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही होणार वापर; कशी असेल सुरक्षा व्यवस्था
  3. अयोध्येतील राम मंदिराच्या २० पुजारी पदांसाठी तब्बल ३००० अर्ज!
Last Updated : Dec 10, 2023, 9:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details