महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चिमुकल्यांची धमाल; नदीच्या पाण्यात डुबक्या मारण्याचा घेतायेत आनंद - summer

उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर लहान चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत होतो. मात्र सकाळपासूनच उन्हाच्या चटक्यांचा जोर वाढत असताना या चिमुकल्यांच्या अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे दुपारच्या कडक उन्हात भीमेच्या थंडगार पाण्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद ही मुले घेत आहेत.

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चिमुकल्यांची थंडगार पाण्यात धमाल

By

Published : Jun 1, 2019, 3:00 PM IST

पुणे- उन्हाळी सुट्ट्या लागल्या, की वेध लागतात ते थंडगार पाण्यात पोहण्याचे. गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणातील तापमानात होणाऱ्या वाढीमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे मुले मोकळ्या वातावरणात आणि थंडगार पाण्यात मस्ती करत सुट्ट्यांचा आनंद घेतात. अशीच मजा भिमाशंकर भोरगिरी परिसरातील चिमुकल्यांनीदेखील घेतली आहे.

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चिमुकल्यांची धमाल; नदीच्या पाण्यात डुबक्या मारण्याचा घेतायेत आनंद

शहरीकरणामुळे लहान मुलांच्या खेळण्यावर मर्यादा येत आहेत. मात्र, खेड्यातील मुले नैसर्गिकरित्या वाहणाऱया नदीच्या पाण्यात डुबक्या घेतानाचे चित्र सध्या दिसत आहे. सह्याद्रीच्या कुशीतून खळखळ वाहणारी भीमा नदी चासकमान धरणाला येऊन मिळते. याच नदीकाठच्या गावातील मुले सुरक्षित ठिकाण पाहून पोहण्याचा आनंद घेत आहेत.

उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर लहान चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत होतो. मात्र सकाळपासूनच उन्हाच्या चटक्यांचा जोर वाढत असताना या चिमुकल्यांच्या अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे दुपारच्या कडक उन्हात भीमेच्या थंडगार पाण्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद ही मुले घेत आहेत. मामाच्या गावाला येणाऱयांची संख्याही येथे अधिक आहे. यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातील मुले मात्र, नदीत पात्रात पोहण्याचा आनंद घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details