पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील भिकारदास मारुतीजवळील एका हॉटेलला (Pune Sadashiv Peth Hotel fire) भीषण आग लागली (hotel fire in Pune) आहे. अग्निशमन दलाच्या जवानांसह अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळावरून 3 सिलिंडर काढले. तसेच आगीत अडकलेल्या सहा वर्षांच्या मुलीला (six year old girl fire rescue) जवानांनी बाहेर काढले. जखमी अवस्थेत मुलीला अग्निशमन दलाच्या वाहनातून जवळच्या सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू (six year old girl died in a hotel fire ) झाला.
Hotel Fire : पुण्यातील हॉटेलला लागलेल्या आगीत सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू - सहा वर्षांची मुलगी आगीत अडकली
पुण्यातील सदाशिव पेठेतील भिकारदास मारुतीजवळील एका हॉटेलला (Pune Sadashiv Peth Hotel fire) भीषण आग लागली (hotel fire in Pune) आहे. अग्निशमन दलाच्या जवानांसह अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळावरून 3 सिलिंडर काढले. तसेच आगीत अडकलेल्या सहा वर्षांच्या मुलीला (six year old girl fire rescue) जवानांनी बाहेर काढले.
![Hotel Fire : पुण्यातील हॉटेलला लागलेल्या आगीत सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू Hotel Fire](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16720438-thumbnail-3x2-fireinhotel.jpg)
Hotel Fire
आगीचे कारण अज्ञात-इकरा नईम खान (वय ६ वर्षे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील भिकारदास मारुतीजवळील एका हॉटेलमध्ये आज सकाळी १०.५२ वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली आणि तात्काळ अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आता ही आग आटोक्यात आली आहे. आग का लागली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.