पुणे(बारामती) -तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात साफसफाई आणि मेन्टेनन्सचे काम सुरू असताना ६ कर्मचारी बेशुद्ध पडले. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कामगारांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
साफसफाई करताना माळेगाव साखर कारखान्यातील सहा कामगार बेशुद्ध - माळेगाव साखर कारखाना कामगार
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात साफसफाई आणि मेन्टेनन्सचे काम सुरू असताना ६ कर्मचारी बेशुद्ध पडले. कारखान्यातील व्हॅक्यूम क्लिनरचे काम सुरू असताना त्यात वायु तयार झाल्याने हे पाच कामगार बेशुद्ध पडले. या कामगारांना बाहेर काढताना आणखी एकजण बेशुद्ध पडला. या सर्वांना बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

माळेगाव सहकारी साखर कारखाना
कारखान्यातील व्हॅक्यूम क्लिनरचे काम सुरू असताना त्यात वायु तयार झाल्याने हे पाच कामगार बेशुद्ध पडले. या कामगारांना बाहेर काढताना आणखी एकजण बेशुद्ध पडला. या सर्वांना बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील ४ जण शुद्धीवर आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर दोघांवर उपचार सुरू असल्याची माहिती कारखान्याकडून सांगण्यात आली.
Last Updated : May 23, 2020, 2:59 PM IST