पुणे - शिरूर शहरातील सिटी बोरा कॉलेज रस्त्यावर 26 जानेवारी झालेला गोळीबारातील प्रमुख आरोपी फरार झाला होता. मोक्का लागू असलेल्या आरोपी मुकेश कुर्लप याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याला मदत करणाऱ्या पाच जणांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी ही माहिती दिली.
बाबु उर्फ मुकेश चंद्रकांत कुर्लप (वय 31 वर्षे), बाबु उर्फ परशुराम मन्छिद्र म्याकल (वय 21 वर्षे, दोघेही रा. कामाठीपुरा,शिरूर), शुभम दत्तात्रय दळवी (वय 25 वर्षे, रा. प्रितमप्रकाश नगर, गणेश मंदिरामागे शिरूर), शुभम नरेश सिंग (वय 24 वर्षे,रा. गुजरमळा, शिरूर), अमोल हनुमंत करजुले (वय 24 वर्षे,रा. बाबुरावनगर, शिरूर), प्रसाद सुनील यादव (वय 31 वर्षे रा.उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
चंदननगर मधून अटक
शिरूर येथे २६ जानेवारी २०२१ रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येत होता. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी बाबू उर्फ मुकेश चंद्रकांत कुलप हा फरार होता. तो प्रसाद यादव याच्या घरी लपून बसला आहे, याची खात्रीलायक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार यादव यांच्याकडे चौकशी केली असता, त्याने तो तिथे नसल्याची माहिती दिला.