महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद - पुणे जिल्हा बातमी

दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीझेल चोरी करून धुमाकूळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे.

आरोपीसह पोलीस पथक
आरोपीसह पोलीस पथक

By

Published : Jun 14, 2021, 4:44 PM IST

दौंड (पुणे) -दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीझेल चोरी करून धुमाकूळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या कारवाईत एकूण पाच लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर सहा आरोपी पुढील तपासासाठी यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल चोरीच्या दोन घटना

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 9 जून, 2021 रोजी मध्यरात्रीनंतर नांदूर येथील एका कंपनी समोर पार्किंग मधील 5 ट्रकमधून सुमारे 83 हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेल्याची घटना घडली होती. तसेच दि. 11 जून, 2021 रोजी पारगाव येथील एका ट्रकमधून 25 हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेले होते. या दोन्ही डिझेल चोरीच्या घटनांबाबत गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला होता. या पोलीस पथकास गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरून उरुळी कांचन परिसरातील काही संशयित इसम यांची नावे समोर आली. या माहितीची खात्री करून उरुळी कांचन परिसरातील दत्तवाडी या ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले.

सहा जणांना घेतले ताब्यात

दत्ता विनोद रणधीर (वय 22 वर्षे, रा. दत्तवाडी उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे), राहुल उर्फ दगड्या मारुती मदने (वय 27 वर्षे, रा. दत्तवाडी उरुळी कांचन, ता. हवेली जि. पुणे), वैभव राजाराम तरंगे (वय 19 वर्षे, रा. दत्तवाडी उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे), प्रतीक बन्सीलाल तांबे (वय 26 वर्षे, रा. दत्तवाडी उरुळी कांचन, ता. हवेली जि. पुणे), स्वरूप विजय रायकर (वय 23 वर्षे, रा. सूर्यवंशी मळा, अष्टापूर फाटा, ता. हवेली जि. पुणे), धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर (वय 34 वर्षे, रा. टिळेकर वाडी, ता. हवेली जि. पुणे) आरोपी दोन चारचाकी घेऊन रात्रीच्यावेळी बाहेर पडून वरील डिझेल चोरीचे गुन्हे करत होते. या आरोपींनी यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरील दोन गुन्हे केल्याचे वरील आरोपीनी कबुली दिली. यावरून त्यांची पोलीस पथकाने अधिक चौकशी केली असता, गुन्हा करतेवेळी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल देखील चोरून नेला होता.

4 लाख 90 हजार रु किंमतीचा मुद्देमाल जप्त

या आरोपींकडून दोन चारचाकी, चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल, एकूण 4 लाख 90 हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी आणि सदरचा मुद्देमाल पुढील तपास कामी यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहेत.

कारवाई करणारे पथक

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोलीस नाईक विजय कांचन, राजू मोमिन, अभिजित एकशिंगे, पोलीस शिपाई अमोल शेडगे, मंगेश भगत, धिरज जाधव, पूनम गुंड, दगडू विरकर यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना.. पिंपरी-चिंचवडमध्ये लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल

ABOUT THE AUTHOR

...view details