पुणे -पिंपरी-चिंचवडमध्ये सख्खे बहीण-भाऊ जमिनीच्या वादामुळे वेगळे झाल्याचे समोर आले. भावाने वडीलोपार्जित जमिनीमध्ये वाटा न दिल्याने बहीण मुक्ताबाई एळवंडे यांनी भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुक्ताबाई यांचे भाऊ माणिक वाळके यांना अटक केली आहे, तर दुसऱ्याची चौकशी सुरू आहे.
जमिनीच्या वादातून बहिणीची भावाविरोधात पोलिसांत तक्रार; भावाला केली अटक - पुणे भाऊ-बहीण वाद
पिंपरी-चिंचवडमध्ये भावाने वडिलोपार्जित जमिनीमध्ये वाटा न दिल्याने एका बहिणीने पोलीस तक्रार दिली आहे. भावाने जमिनीमध्ये गैरव्यवहार केल्याचा मुक्ताबाई एळवंडे यांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाऊ माणिक वाळके यांना अटक केली आहे,

हेही वाचा -आज मी का मरत आहे ? महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राने खळबळ
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात राहणाऱ्या मुक्ताबाई वाळके यांना तीन भाऊ आहेत. त्या वडिलांना एकुलत्या एक मुलगी आहेत. त्यांच्या वडिलांनी मुलांना जमिनीविषयी हक्क पत्र दिले. मात्र, त्याचा गैरवापर करत त्याने काही जमीन स्वतःच्या मुलाच्या नावावर केल्याचा आरोप मुक्ताबाई यांनी केला आहे. ही त्यांची फसवणूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. या प्रकरणी पोलीस कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन अधिक तपास करत आहेत.