महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रमजानवर कोरोनाचे सावट : नमाज, इफ्तार घरीच करा, पुण्यातील सिरत कमेटीतर्फे आवाहन

पुण्यात दिवसंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. अशा या परिस्थितीत रमजान येत असल्याने नागरिकांनी घरीच नमाज पठन करावी. तसेच कोणीही घराचे छत किंवा पार्किंगमध्ये नमाज पठन व गर्दी करू नये. रमझानमध्ये इफ्तार पार्टी न करता गोरगरीब किंवा गरजू नागरिकांना मदत करावी. तसेच तरावीची नमाज ही प्रत्येकाने घरीच पठन करावी, असे आवाहन सिरत कमेटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद खान यांनी केले आहे.

रमजानमध्ये नमाज, इफ्तार घरीच करा, गर्दी करू नका; पुण्यातील सिरत कमेटीतर्फे नागरिकांना आवाहन
रमजानमध्ये नमाज, इफ्तार घरीच करा, गर्दी करू नका; पुण्यातील सिरत कमेटीतर्फे नागरिकांना आवाहन

By

Published : Apr 21, 2020, 12:57 PM IST

पुणे - इस्लाम धर्मात मानला जाणारा पवित्र महिना म्हणझे रमझान. यात मुस्लीम बांधवांकडून महिनाभर कडक उपवास पकडले जातात. मात्र, यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत पुण्यातील सिरत कमेटी व हिलाल कमेटी यांच्यावतीने नागरिकांना काही आवाहन करण्यात आले आहे. पुण्यात दिवसंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून शासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. अशा या परिस्थितीत रमजान येत असल्याने नागरिकांनी घरीच नमाज पठन करावी. तसेच कोणीही घराचे छत किंवा पार्किंगमध्ये नमाज पठन व गर्दी करू नये. रमझानमध्ये इफ्तार पार्टी न करता गोरगरीब किंवा गरजू नागरिकांना मदत करावी. तसेच तरावीची नमाज ही प्रत्येकाने घरीच पठन करावी, असे आवाहन सिरत कमेटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद खान यांनी केले आहे.

रमजान हा इस्लाम धर्मातील एक पवित्र महिना मानला गेला आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचा असा हा महिना असून या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्त्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद सल्ललाहु अलैही वसल्लम यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.

इस्लामिक महिने चांद्रिक काल गणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरुवातदेखील चंद्रदर्शनाने होते. चंद्रदर्शन ज्या दिवशी होते त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे. म्हणूनच मुस्लीम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नत (स्वर्ग)चे दार उघडले जाते व जहन्नम (नरक)चे दार बंद केले जाते अशी मान्यता आहे. त्यानंतर सूचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे त्यांनी पुढे व्हावे आणि जे लोक वाईट कृत्य करणारे आहेत त्यांनी त्यापासून लांब थांबावे.

यंदा रमजानमध्ये सर्वांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. कोणीही या पवित्र महिन्यात आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार, असे काही करू नये. असे आवाहनही सिरत कमेटीतर्फे करण्यात आलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details