पुणे Mamata Sapkal Interview : 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचा वारसा आणि त्याचा वारसदार यासाठी आता वाद निर्माण झालाय. संस्थेच्या सचिवानं सिंधुताईंचं नाव लावून संस्था बळकवण्याचा प्रकार केल्याचा आरोप अशोक सपकाळ यांनी केलाय. त्यावर आता सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांनी ईटीव्ही भारतला सविस्तर मुलाखत दिलेली आहे. त्यावर हा वाद चर्चेतून सोडवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
काय म्हणाल्या ममता सपकाळ : या वादावर बोलताना ममता सपकाळ म्हणाल्या, "दोन भावांमधला वाद इतक्या टोकाला जाईल याची कल्पना मला नव्हती. मागच्या मे महिन्यात आम्ही सर्वजण एकत्र भेटलो होतो. जे काही नाव बदललं ते प्रकरण एक वर्षापूर्वीच आहे. ते सर्वांना माहीत आहे. एक वर्ष या सगळ्या नाव बदलण्याला झाल्यानंतर हे का घडलं असावं, याचं उत्तरही माझ्याकडं नाही. संस्थेला काय हवं ते मी पाहत होते. पण, एवढं एक वैयक्तिक पातळीवर काही प्रकरण गेल्याची मला कल्पना नव्हती. आम्ही सर्वजण यामधून मार्ग काढून चर्चेनं प्रश्न सोडवू. वाद निर्माण झालाय, असं मला वाटत नाही. कारण वाद हा दोन्ही बाजूनं व्हायला हवा. कुठेतरी एकच बाजू समोर येत असेल तर त्याला वाद म्हणता येणार नाही. तो गैरसमज असू शकतो. त्यामुळं हे सर्व काही गैरसमजतून होत आहे. चर्चेनं या सर्व गोष्टी सुटतील."
माईंच्या संस्थेतील वाद व्यक्तिगत स्तरावर गेल्याचं क्लेशदायक, चर्चेतून मार्ग काढू : ममता सपकाळ - गोपिका गाय रक्षण
Mamata Sapkal Interview : सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचा वारसा तसंच वारसदार कोण यासाठी वाद निर्माण झालाय. यावर आम्ही चर्चेतून मार्ग काढू, असं सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत म्हटलंय.

Published : Dec 25, 2023, 11:04 AM IST
|Updated : Dec 25, 2023, 12:25 PM IST
संस्थांचं काम कशा प्रकारे सुरु : माईंनं ज्या पद्धतीनं संस्था सुरू केल्या आहेत. त्याच कामाचा धागा पकडून आम्ही सर्वजण काम करत आहोत. आमच्या सगळ्यात मोठा दीपक आहे, तो माईंचा पाहिला मुलगा आहे. ते दीपक हे ममता बाल सदन सासवडचं काम सांभाळतात. त्या ठिकाणी 75 मुली आहेत. मी 'सन्मती बाल निकेतन', मांजरीचं काम सांभाळते, तिथं 50 मुलं आहेत. विनय हा शिरुर मधील मन:शांती छात्रालय तिथं 80 मुलं आहेत. अरुण चिखलदऱ्याचं काम बघतात. तिथं आता 55 मुलं आहेत. मनीष गोपिका या गाय रक्षणाचं काम बघतात. अशा प्रकारे या पाच संस्था असून असा माईंचा परिवार आहे. अशा पद्धतीनं काम सुरु असल्याची माहिती ममता सपकाळ यांनी दिली आहे. एकूण 260 मुलांचं संगोपन करण्याचं काम आम्ही त्याच पद्धतीनं आजही करत आहोत. माई गेल्या त्यावेळेस 210 मुलं होती. त्यांची संख्या आता 260 झाल्याचंही ममता सपकाळ यांनी सांगितलंय.
वाद होणे खुप क्लेशदायक : वाद व्हायला नको होता. गैरसमज चर्चेनं सोडवले असते. आमची या वादावर त्यानिमित्तानं काही चर्चा झालेली नाही. वीस दिवसापूर्वी ही बातमी आली, हे खूप धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. इतकं सर्व खदखदत आहे, हे मुळात मला माहित नव्हतं. जे मी काम करते, त्या कामामुळं मला या गोष्टीची माहितीच नाही. 207 मुलांचं काम करताना प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललय हे मला काही माहिती नाही. पण आमच्यातला जो वाद आहे, तो सगळा अनापेक्षितपणे माझ्यासमोर आलाय. मला हे थोडं आश्चर्यकारकही वाटलं. पण त्यातूनही आम्ही चर्चेनं मार्ग काढू. सख्ख्या भावांमध्ये भांडण होतात, आम्ही तर माईंची लेकरं आहोत. माईंनं कधीच कुणाला परकं समजलं नाही. तीच शिकवण आमच्या सर्वांना आहे. परकेपणा तिनं दाखवला नाही. त्यामुळं यात सुद्धा कोणी परक नाही. सगळे मला समान आहेत. त्यामुळं यातून सुद्धा मार्ग निघणार अशा ममता सपकाळ यांनी व्यक्त केलीय. 260 मुलं सांभाळणं म्हणजे केवळ खाऊ-पिऊ घालणार नाही. तर ते पुढच्या समाजाचा घटक आहेत. त्या पद्धतीनं त्यांना तयार करणं ही जबाबदारी आहे. त्यातून मला या सगळ्या वादाकडल्या गोष्टीकडं लक्ष द्यायला वेळ नसल्याचंसुद्धा त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा :