बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात 'सिम्युलेटर मशीन' कार्यान्वित - आरटीओ कार्यालयांना सिम्युलेटर मशीनचे वाटप
रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्याच्या एका महत्वाच्या मशीनची निर्मिती करण्यात आली आहे .त्या मशीनचे नाव 'सिम्युलेटर मशीन' ( Simulator machine ) आहे. ही मशीन बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ( Baramati Sub-Regional Transport Office ) कार्यान्वित करण्यात आली आहे. परिवहन विभागाकडून राज्यातील बहुतांश आरटीओ कार्यालयांना 'सिम्युलेटर मशीन' देण्यात आली आहे.
पुणे : जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड हे तीन तालुके राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचे तालुके आहेत. या तीन तालुक्यातील वाहनधारकांच्या सोयीसाठी बारामती येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची उभारणी ( Establishment of Baramati Sub-Regional Transport Office ) करण्यात आली आहे. या तीनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाहनधारक आहेत. या तीनही तालुक्यात शिकाऊ वाहनधारकांना वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी प्रत्यक्षात वाहनांची ट्रायल देण्याआधी 'सिम्युलेटर' मशीनचा ( Simulator machine ) उपयोग केल्यास शिकाऊ चालकाला प्रत्यक्ष वाहन चालवताना मदत होते.
अपघाताचे प्रमाण कमी होण्यास होणार मदत -
शिकाऊ वाहन चालकांना वाहन चालवण्याचा परवाना मिळविण्यासाठी त्याला रहदारीच्या रस्त्यावर ट्रायल घ्यावी लागते. अनेकदा अशा ट्रायलमुळे अपघात होतात. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयामार्फत 'सिम्युलेटर' मशीनचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मशिनद्वारे सहा किमीचे अंतर पार करायचे आहे. या अंतरात रस्त्यावरील चढ-उतार, वळण आहेत. तसेच अनपेक्षितपणे एखादे दुसरे वाहन आडवे आल्यास आपले वाहन तात्काळ कसे थांबवावे. इत्यादीचा सराव या मशीनद्वारे शिकाऊ वाहनचालकांना करता येणार आहे.