महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Koyta Gang : शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर भरदिवसा कोयत्याने हल्ला - कोयता गँग

प्रेम प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झाले. एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. यात अल्पवयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

Pune Koyta Gang
Pune Koyta Gang

By

Published : Jan 31, 2023, 6:47 PM IST

विद्यार्थ्यांवर भरदिवसा कोयत्याने हल्ला

पुणे : पुणे शहारत गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगची दहशत वाढत चालली आहे. पोलिसांकडून कॉम्बीग ऑपरेशन करून अनेक आरोपींना अटक देखील करण्यात आले आहे. असे असताना देखील शहरात कोयता गँगची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही. असाच कोयता गँगचा थरार आज पुण्यात पहायला मिळाला. एका अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलावर कोत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

विद्यार्थ्याच्या हातावर कोयत्याने वार :पुण्यातील एका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर भर दिवसा कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला आहे. विद्यार्थ्याच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आले आहे. या प्रकरणी १७ वर्षीय तरुणाने या शाळकरी मुलावर हल्ला केला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मौत्रिणीशी बोलण्यावरुन वाद :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब शेख( नाव बदललेले आहे) तसेच भूषण पाटील या दोघांमध्ये मौत्रिणीशी बोलण्यावरुन वाद झाला आहे. भूषण पाटील पुण्यातील पद्मावती भागात राहायला आहे. तर नवाब शेख हा तुळशीबागेत काम करतो. भूषण पाटील हा १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे.

नवाब शेखला अटक :भूषण पाटील हा नवाब शेखच्या मैत्रिणीशी बोलत बस स्टॉप वर बसला होता. त्याचा राग नवाब शेखला आला. नवाब शेखने भूषण पाटीलवर कोयता उगारला. यात मध्यस्ती करणाऱ्या विद्यार्थांना देखील कोयता लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नवाब शेखला अटक केली असून पोलिस अधिक तपास करीत आहे.

विधीसंघर्षित बालकाने ठोकली धूम :पुण्यातील कोयता गँगचे इतरही कारनामे कमी होताना दिसत नाहीत. येरवडा येथे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहात सात विधीसंघर्ष बालकांना काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या गुन्हा प्रकरणी ठेवण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीला शिडी लावून विधीसंघर्षित बालकांनी धूम ठोकली आहे. सुधारगृह तोडून खतरनाक विधीसंघर्ष बालक पळाल्याने शहरात एकच खळबळ आहे.

कोयता टोळीची मोठी दहशत :पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता टोळीने मोठी दहशत पसरवली आहे. पोलीस सातत्याने कोयता टोळीवर कारवाई करत असताना पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारक सुधारगृहामध्ये सात विधीसंघर्ष बालक पळून गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे सातही विधीसंघर्ष बालक कोयता टोळीचे सदस्य असल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे शहरांमध्ये पुन्हा कोयता टोळीची दहशत निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -Asaram Bapu Sentenced Life Imprisonment: बलात्कार प्रकरणात वादग्रस्त आसारामला जन्मठेपेची शिक्षा.. न्यायालयाचा निकाल

ABOUT THE AUTHOR

...view details